
यादव महाराज पुण्यतिथी सोहळा
L99242
कोल्हापूर : साकोली कॉर्नर येथील श्री ज्ञानदेव सदनमध्ये श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त उपस्थित महादेव महाराज यादव, आनंदराव वायदंडे आदी.
यादव महाराज पुण्यतिथी सोहळ्याची सांगता
कोल्हापूर, ता. २८ : वारकरी संप्रदायाचे ब्रह्मीभूत श्री सद्गुरु रामचंद्र महाराज यादव यांची ४६ वी पुण्यतिथी आणि श्रीगुरु भानुदास महाराज यादव यांच्या द्वितीय पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम झाले. साकोली कॉर्नर येथील श्री ज्ञानदेव सदनमध्ये २१ ते २८ कालावधीत श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा झाला.
सकाळी काकड आरती झाली. श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याची सांगता झाली. श्री नामदेव महाराजांचे विद्यमान वंशज माधव महाराज नामदास (पंढरपूर) यांचे काल्याचे किर्तन झाले. दहीहंडी फोडली. शहाजी पाटील यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप झाले. महादेव महाराज यादव, आनंदराव वायदंडे, नामदेव पाटील, अविनाश बिडीकर, संजय सुतार, जगन्नाथ पाटील, पुरुषोत्तम यादव, ज्ञानेश्वर यादव, रामचंद्र जाधव, धनाजी यादव आदींनी नियोजन केले.
दरम्यान, गुरुवारी (ता. २७) टाळमृदंग, हरीनामाच्या गजरात दिंडी नगर प्रदक्षिणा काढली. साकोली कॉर्नर, ताराबाई रोड, श्री जोतीबा मंदिर, जुना राजवाडा, भवानी मंडपातील क्रीडा स्तंभाजवळ महिलांनी फुगडीचा फेर धरला. श्री तुळजाभवानी मंदिरात गोंधळाचा अभंग घेतला.बिनखांबी गणे मंदिर मार्गे उभा मारुती चौक येथे श्री हनुमंतांचा अभंग घेतला. दिंडीमध्ये श्री विठ्ठल-रखमाई, श्री ज्ञानेश्वर माऊली, श्री तुकाराम महाराज, श्रीगुरु रामचंद्र महाराज यादव, श्री भानुदास महाराज यादव यांच्या प्रतिमा होत्या. पालखीत ब्रह्मीभूत विनायक महाराज साखरे यांच्या पादूका ठेवल्या होत्या. भाजपचे शहराध्यक्ष राहुल चिकोडे, अजित ठाणेकर यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले.