आज , उद्या आयपीएल फॅन पार्क

आज , उद्या आयपीएल फॅन पार्क

रुईकर कॉलनी मैदानावर
आज, उद्या आयपीएल फॅन पार्क

कोल्हापूर, ता. २८ : आयपीएल स्पर्धेच्या १६ व्या हंगामाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शनिवारी (ता. २९) व रविवारी (ता. ३०) रुईकर कॉलनी मैदानावर ''फॅन पार्क''चे आयोजन केले आहे. या फॅन पार्कसाठी सर्वाना विनामूल्य प्रवेश असल्याची माहिती केडीसीएचे अध्यक्ष चेतन चौगुले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या वेळी बीसीसीआय प्रतिनिधी अनंत दातार, केदार गयावळ, अभिजित भोसले उपस्थित होते.
दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यत आयपीएलमधील सामन्याचे कोल्हापूरातील रुईकर कॉलनी मैदानावर थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. ३२ फूट बाय १८ फूट अशा एलईडी स्क्रीनवर मैदानावरील अनुभूती मिळवणार आहे. दुपारी दीडपासून प्रवेश दिला जाईल. कोल्हापूरच्या क्रीडा रसिकांना अगदी स्टेडियमसारखा थरार अनुभवता येईल. थेट प्रेक्षपणाबरोबरच पार्कमध्ये संगीत तसेच विविध स्टॉल्समधून खाण्या ­पिण्याचे पदार्थ आणि इतर वस्तू तसेच आयपीएलच्या प्रायोजकांकडून बक्षिसे मिळणार आहेत. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com