चंद्रकांत पाटील यांनी केले महादेवराव महाडिक यांचे अभिनंदन

चंद्रकांत पाटील यांनी केले महादेवराव महाडिक यांचे अभिनंदन

फोटो-99259
................

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले महाडिक यांचे अभिनंदन

कोल्हापूर, ता. २८ ः राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीतील यशाबद्दल माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे अभिनंदन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या शिरोली येथील निवासस्थानी जावून केले.
मंत्री पाटील यांनी हनुमानाची मूर्ती देवून महाडिक यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मंगलताई महाडिक, अंजली पाटील, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री पाटील यांनी सकाळी ताराराणी विद्यापीठात विविध महाविद्यालयांतील प्राचार्यांसमवेत संवाद साधला. यावेळी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा, बीबीए., बीसीए., विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, सीएचबीधारकांचे मानधन, आदी प्रश्‍न शिवाजी विद्यापीठ प्राचार्य संघटनेने मांडले. त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याची ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली. त्यांनतर त्यांनी भाजपच्या कार्यालयाला भेट देवून तेथील कामाचा आढावा घेतला. ॲड. गुलाबराव घोरपडे यांच्या निवासस्थानी जावून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. शासकीय विश्रामगृहात मंत्री पाटील यांनी काही कार्यकर्ते, पदाधिकारी यांची भेट घेतली. काही संघटनांची निवेदने स्वीकारली. त्यानंतर त्यांनी महाडिक यांची भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com