शाहू समाधी स्थळ

शाहू समाधी स्थळ

राजर्षी शाहू समाधीस्थळासाठी ९ कोटींचा निधी

सहायक आयुक्त विशाल लोंढे : जागेची अट शिथिल

कोल्हापूर, ता. २८: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे सुशोभीकरण व इतर कामांसाठी ९ कोटी ४० लाख ५६ हजार १०८ रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे. समाधीस्थळाची जागा सामाजिक न्याय विभागाच्या नावावर असण्याबाबतची अट शिथिल केली आहे. त्यामुळे समाधीस्थळाची कामे गतीने होणार असल्याचेही श्री लोंढे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे सांगितले.

लोंढे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, समाधीस्थळाची जागा सामाजिक न्याय विभागाच्या नावावर नसल्याने तांत्रिक अडचण येत होती. मात्र, ही अट आता शिथिल केली आहे. त्यामुळे हे काम अद्यापही सुरू झालेले नव्हते. दरम्यान, ही अट सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन परिपत्रकाद्वारे आज शिथिल केली आहे. त्या अनुषंगाने शाहू समाधी स्थळाचे विकासकाम कोल्हापूर महानगरपालिकेने तात्काळ सुरू करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी दिले आहेत.
त्यामुळे अनेक महिने प्रलंबित असलेल्या या कामाला गती मिळणार आहे. कोल्हापूरसह महाराष्ट्रातील शाहूप्रेमींच्या आणि संपूर्ण बहुजन समाजाच्या जिव्हाळ्याचा व अस्मितेचा प्रश्न यामुळे मार्गी लागणार आहे. खऱ्या अर्थाने शाहू महाराज यांचे समाधीस्थळाचे सुशोभीकरण करण्याच्या कामास गती येणार आहे. तसेच या समाधीस्थळाच्या संपूर्ण कामकाजावर जिल्हाधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांच्या देखरेखीखाली होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com