
असंडोली चित्रपट महोत्सव
99407
कोल्हापूर ः गगनबावडा तालुक्यातील कोतोलीतर्फ असंडोली येथे बालचित्रपट पहाताना वाड्या-वस्त्यांवरील मुले.
सिनेमा चांगली स्वप्नं पहायला शिकवतो
मिलिंद यादव; कोतोली तर्फ असंडोली येथे चित्रपट महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः चांगला सिनेमा आपल्याला चांगली स्वप्नं पहायला शिकवतो. त्यामुळे आपण लहान वयापासूनच चांगले सिनेमे पहायला हवेत, असे स्पष्ट मत चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचे संस्थापक मिलींद यादव यांनी व्यक्त केले. कोतोलीतर्फ असंडोली येथील बाल चित्रपट महोत्सवात ते बोलत होते.
विद्यार्थी, विद्यार्थींनीसह ग्रामस्थांनी लेझीम पथकाच्या तालात उपस्थितांचे स्वागत केले. ‘म्युनॅस्क्युअल अँट इन द जंगल'',‘द सर्कस'', ‘द बटरफ्लाय'' हे चित्रपट दाखवविण्यात आले . या वेळी पोलिस भरती झालेल्या कुमार भूतल व सरस्वती शिंगे यांचा सत्कार झाला. कडवे, पाटीलवाडी, कुपलेवाडी, पखालेवाडी, पानारवाडी, हुंबेवाडा व असंडोली या वाडयांतील दीडशेहून अधिक मुलांनी महोत्सवात सहभाग घेतला. या वेळी सरपंच प्रियंका पाटील, मनोज नारकर, दगडू कुपले, तसलीम पखाले, वैशाली टिंगे, भागाबाई हुंबे, संगीता सुतार, चिल्लर पार्टीचे शैलेश चव्हाण, मुख्याध्यापक डि. एम. पोवार आदी उपस्थित होते. सुहास पाटील यांनी प्रास्ताविक केले. आनंदा पाटील यांनी आभार मानले.