
मोटारसायकल चोरट्यास अटक
फोटो नितीन देणार आहे.
-------------------
चोरट्याकडून सात मोटारसायकली जप्त
गुन्हे अन्वेषण शाखेची हातकणंगले - सांगली मार्गावर कारवाई
कोल्हापूर, ता. २९ ः मोटारसायकल चोरट्याला अटक करून त्याच्याकडून दोन लाख ऐंशी हजार रुपये किंमतीच्या सात मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या. विशाल सुभाष कोळी (वय २४, रा. बस स्टॅण्ड मागे, चौगुले मळा, चिपरी, ता. शिरोळ) असे चोरट्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज हातकणंगले ते सांगली मार्गावर ही कारवाई केली.
पोलिसांनी सांगितले की, संशयित विशाल कोळी हा त्याच्या साथीदाराला घेवून चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी हातकणंगले ते सांगली रोडवरील उमळवाडा फाटा येथील राजे हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस अंमलदार फिरोज बेग यांनी याबाबत अधिक माहिती घेतली. त्यानुसार पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनायक सपाटे, सहाय्यक फौजदार राजीव शिंदे, संभाजी भोसले, आयुब गडकरी व बालाजी पाटील यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील मोटारसायकलबाबत चौकशी केली असता त्याने हातकणंगल्यातून ती चोरल्याचे दिसून आले. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने व त्याच्या साथीदारांनी मिळून मागील एक वर्षापासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आणखी पाच मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.
----------
मोटारसायकली चोरल्याचे
पाच गुन्हे उघडकीस
चोरटा विशाळ कोळी आणि त्याच्या साथीदारांना मोटारसायकल वापरण्याची आवड होती. त्यामुळे त्यांनी त्या चोरून त्यामध्ये बदल करून वापरल्या असल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यांनी हातकणंगले (१), गावभाग (२), कुरूंदवाड (१), जयसिंगपूर (१) येथून मोटारसायकली चोरल्याचे पाच गुन्हे उघडकीस आले असून एक मोटारसायकल ही दुधगाव (जि.सांगली) येथील असल्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.