आज एम.पी.एस.सी परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज एम.पी.एस.सी परीक्षा
आज एम.पी.एस.सी परीक्षा

आज एम.पी.एस.सी परीक्षा

sakal_logo
By

जिल्ह्यातील २३ हजार परीक्षार्थी
देणार एमपीएससी परीक्षा


७१ केंद्रांवर होणार आज परीक्षाः सर्वाधिक परीक्षार्थी टंकलेखक पदासाठी

कोल्हापूर, ता. २९ ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांसाठी घेतली जाणारी दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा आज (ता. ३०) जिल्ह्यातील ७१ केंद्रांवर होणार आहे. यासाठी २३ हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. टंकलेखक संवर्गातील ७०३४ पदांसाठी राज्यभरातून उमेदवार ही परीक्षा देणार आहेत. यासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेतून सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक (श्रेणी १), मुद्रांक शुल्क निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, राज्य उप्तादन शुल्क, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपीक, टंकलेखक ही पदे भरली जाणार आहेत. ही पदे महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क वर्गातील आहेत. जिल्ह्यातील ७१ केंद्रावर २३ हजार उमेदवार ही परीक्षा देणार आहेत. इचलकरंजी, पेठवडगाव, वारणानगर, कागल, निगवे यांच्यासह अन्य प्रमुख केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. यासाठी १८ समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून ३ भरारी पथकेही नेमण्यात आली आहेत.
--.

सकाळी साडेनऊ वाजता
उपस्थिती आवश्यक

ही परीक्षा सकाळी ११ ते १२ या वेळेत होणार आहे. मात्र परीक्षार्थींनी आपल्या परीक्षा केंद्रावर सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. परीक्षा केंद्रामध्ये पालकांना प्रवेश दिला जाणार नाही. सर्व केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.