गड-संक्षिप्त

गड-संक्षिप्त

आपला दवाखान्याचे आज उद्‍घाटन
गडहिंग्लज : सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे येथील शेंद्री रोडवरील बीरदेव मंदिरासमोरील इमारतीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उभारला आहे. या दवाखान्याचे उद्या (ता. १) सकाळी दहाला उद्‍घाटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिजीटल पद्धतीने उद्‍घाटन होईल. या दवाखान्याच्या माध्यमातून नागरीकांना आरोग्य सेवा, तपासणी, औषधे मोफत दिली जाणार आहेत. या ठिकाणी डॉक्टर व पॅरामेडीकल स्टाफ उपलब्ध करुन दिला जाणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीता कोरे यांनी केले आहे.
----------------------
99525
इंचनाळ : जय जवान जय किसान फाउंडेशनतर्फे राजश्री पोवार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कुमार पाटील, सुबराव पाटील, संजय जाधव, बाळासाहेब पोवार उपस्थित होते.

राजश्री पोवार यांचा सत्कार
गडहिंग्लज : इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील राजश्री पोवार यांची नवी मुंबई पोलिस दलात निवड झाली. बबन पोवार हे गेली ३८ वर्षे ऊसतोड कामगार म्हणून काम करतात. खडतर परिस्थितीत त्यांच्या मुलीने हे यश मिळविले आहे. त्याबद्दल येथील जय जवान जय किसान फाउंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी सुबराव पाटील, संजय जाधव, बाळासाहेब पोवार, अध्यक्ष कुमार पाटील, बबन पोवार, सुरेखा पोवार उपस्थित होते.
------------------
मासेवाडीत मंगळवारपासून महालक्ष्मी यात्रा
दुगूनवाडी : मासेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा १२ वर्षानंतर होत आहे. त्या निमित्ताने विविध कार्यक्रम होत आहेत. मंगळवारपासून (ता. २) तीन दिवस यात्रा होणार आहे. मंगळवारी सायंकाळी देवीची पूजा व रात्रीनंतर उत्सवमूर्तीची मिरवणूक आहे. बुधवारी (ता. ३) सकाळी सातला देवी स्थानापन्न होईल. हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. रात्री स्टार ऑर्केस्ट्रा होणार आहे. गुरुवारी (ता. ४) सकाळच्या सत्रात खुल्या बैलगाडी व घोडागाडी शर्यती होतील. जनरल बैलगाडी साठी अनुक्रमे १५००१, ७००१, ५०५१ रुपये तर घोडागाडीसाठी १०००१, ७००१, ५०५१ रुपयांची बक्षीसे आहेत. दंडवत, ओटी भरणे व सायंकाळी लक्ष्मीदेवी पावण देणे सोहळा आहे. महालक्ष्मी यात्रा समिती व ग्रामपंचायतीने नियोजन केले आहे.
------------------
99526
गडहिंग्लज : दिनकर खवरे यांच्या लघुकथा संग्रहाचे शिवलिंगेश्वर महास्वामीजी, भगवानगिरी महाराज, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

दिनकर खवरेंच्या लघुकथा संग्रहाचे प्रकाशन
गडहिंग्लज : दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शिक्षक दिनकर खवरे यांच्या कथारत्न या लघुकथा संग्रहाचे प्रकाशन झाले. जगद्गुरु पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी, भगवानगिरी महाराज, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. येथील संत बाळूमामा हालसिद्धनाथ मंदिरात हा कार्यक्रम झाला. मंदिर कमिटी अध्यक्ष रमेश रिंगणे यांनी केले. शिवलिंगेश्वर महास्वामीजी, श्री. वाघमोडे, श्री. शेळके, बसवराज आजरी यांची भाषणे झाली. उपाध्यक्ष विठ्ठल भमानगोळ, आनंदा चोथे, संदीप रिंगणे, बाळासाहेब गुरव, जयसिंग पवार, मजिद किल्लेदार, राजू पोवळ, शिवाजी पाटील, जवाहर घुगरे, रावसाहेब कुरबेट्टी आदी उपस्थित होते. मंदिराचे सहसचिव चंद्रकांत सावंत यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com