शंकराचार्य जयंती उत्सवाला प्रारंभ

शंकराचार्य जयंती उत्सवाला प्रारंभ

99645
कोल्हापूर : शुक्रवार पेठेतील श्री शंकाराचार्य मठात आज आद्य शंकराचार्य जयंती उत्सवाला प्रारंभ झाला. उपस्थित महिलांनी पाळण्याचे गायन केले.

आद्य शंकराचार्य जयंती उत्सवास प्रारंभ
-
आठवडाभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : शुक्रवार पेठेतील श्री शंकराचार्य पीठ करवीर येथे आद्य शंकराचार्य जयंती उत्सवाला आज उत्साहात प्रारंभ झाला. आद्य शंकराचार्यांच्या जयंतीनिमित्त पीठामध्ये पाच मेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यानुसार सकाळी सात वाजता सुशांत वझे यांच्या हस्ते अथर्ववेद संहितेचा अभिषेक करण्यात आला. श्रीराम शैव यांचे दशोपनिषद वाचन झाले. आठ वाजता नारायण जोशी यांचे गीता भाष्य झाले.
हळवे गुरुजी यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता जन्मकाळाचे कीर्तन झाले. त्यानंतर दुपारी १२ वाजता महिलांच्या हस्ते जन्मकाळाचा विधी झाला. सायंकाळी पाच वाजता प्रमोद शास्त्री कुलकर्णी यांचे श्रीमद देवी भागवत झाले तर वंदना रवींद्र घांगुर्डे यांचे रात्री आठ वाजता गायन कार्यक्रम झाला. करवीर पीठाचे शंकाराचार्य स्वामी विद्यानृसिंह भारती, कार्यवाह शिवस्वरूप भेंडे उपस्थित होते.

चौकट
आज होणारे कार्यक्रम
उद्या (ता. १) सकाळी आठ ते दुपारी १२ पर्यंत राजेश्‍वर शास्त्री (धारवाड) यांच्या निर्देशनाखाली अनिरुद्ध जोशी गुरुजी हवन करतील. सायंकाळी पाच ते सात वेळेत प्रमोद शास्त्री कुलकर्णी (परभणी) हे श्रीमद्‌ देवी भागवतवर मार्गदर्शन करतील. रात्री आठ वाजता ‘ज्योतीष : समज-गैरसमज’ यावर महेंद्र इनामदार माहिती देतील. मंगळवारी (ता. २) हवन, श्रीमद्‌ देवी भागवत असे कार्यक्रम होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com