गिरणी कामगारांचा रास्ता रोको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गिरणी कामगारांचा रास्ता रोको
गिरणी कामगारांचा रास्ता रोको

गिरणी कामगारांचा रास्ता रोको

sakal_logo
By

ajr301.jpg
99663
आजरा ः येथील संभाजी चौकात गिरणी कामगारांनी ठिय्या ठोकत रास्ता रोको केला. (छायाचित्र ः श्रीकांत देसाई, आजरा)
-----------------
गिरणी कामगारांचा रास्ता रोको
आजऱ्यात तासभर वाहतूक ठप्प; मुंबईत घरांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २९ ः गिरणी कामगारांना मुंबईत गिरणीच्या जागेतच घरे मिळावीत. या मागणीसाठी आजऱ्यात सर्व श्रमिक संघातर्फे रास्ता रोको आंदोलन केले. संभाजी चौकात ठिय्या ठोकल्यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चाला सुरवात झाली. सरकारविरोधात घोषणाबाजी करत मुख्य बाजारपेठ मार्गे मोर्चा संभाजी चौकात आल्यावर गिरणी कामगारांनी ठिय्या ठोकत रास्ता रोको आंदोलन केले. सर्व श्रमिक संघटनेचे आजरा तालुकाध्यक्ष शांताराम पाटील म्हणाले, ‘सरकारला जागे करण्यासाठी मोर्चा काढला आहे. सरकार गिरणी कामगारांना आश्वासित करून चालढकल करत आहे. मुंबईतच गिरणी कामगारांना घरे मिळावीत यासाठी आम्ही ठाम आहोत. मुख्यमंत्री यांनी गिरणी कामगारांच्या प्रश्नात लक्ष घालून मार्ग काढू असे आश्वासन दिले होते. पण अद्याप त्याबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानावर गिरणी कामगार मोर्चा काढणार होते. त्यांनी संघटनेला चर्चेतून मार्ग काढू असे सांगीतले होते. त्याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.’
शिवाजी सावंत म्हणाले, ‘सत्तेवर बसावयाचे असेल तर गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू.’ संजय घाटगे म्हणाले, ‘आजचा मोर्चा हा गिरणी कामगारांना जाग आणण्यासाठी काढला आहे. येथून पुढे आमचा लढा सुरु राहणार आहे.’ गोपाळ गावडे, नारायण भडांगे यांची भाषणे झाली. नारायण राणे, काशिनाथ मोरे, विजय पाटील, गणपती ढोणुक्षे, मानाप्पा बोलके, जानबा धडाम, धोंडीबा कांबळे, हिंदुराव कांबळे, दौलती राणे, निवृत्ती मिसाळ आदी उपस्थित होते. संजय घाटगे यांनी आभार मानले.