महाराष्ट्र दिनाचा आज सोहळा

महाराष्ट्र दिनाचा आज सोहळा

शाहू स्टेडियमवर आज
महाराष्ट्र दिनाचा सोहळा

कोल्हापूर ः महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापनदिनाचा शासकीय सोहळा सोमवारी (ता.१) शाहू स्टेडियमवर रंगणार आहे. सकाळी आठ वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ध्वजवंदन व त्यानंतर विविध कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शहर आणि जिल्‍ह्यात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून स्नेहमेळावा, आरोग्य शिबिर, कामगार नोंदणी आदी कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे.
........

पालकमंत्र्याच्या उपस्थितीत
आज शहरात विविध कार्यक्रम

कोल्हापूर ः पालकमंत्री दीपक केसरकर सोमवारी(ता.१) दौऱ्यावर येत असून शहरात त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. शाहू स्टेडियमवर सकाळी महाराष्ट्र दिनाचा शासकीय सोहळा झाल्यानंतर साडेनऊ वाजता ते कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनला भेट देतील. त्यानंतर दहा वाजता पितळी गणपती येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या डिजीटल अनावरण सोहळ्यासाठी ते उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी अकरा वाजता शिवाजी विद्यापीठातील शालेय शिक्षणात आभासी वास्‍तविकता तंत्रज्ञान प्रणालीचे उदघाटन आणि साडेअकरा वाजता महापालिकेच्या ई-गव्हर्नस प्रकल्पाच्या उदघाटन समारंभाला ते उपस्थित राहतील. बाराच्या सुमारास करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेवून ते सिंधुदुर्गकडे प्रयाण करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com