Wed, Sept 27, 2023

आवश्यक महत्वाची बातमी
आवश्यक महत्वाची बातमी
Published on : 30 April 2023, 4:53 am
फक्त फोटो : 99716
कोल्हापूर : यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे छत्रपती संभाजीनगर वृत्तपत्र विक्रेता डेपोला एक मे कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर टोप्यांचे वाटप केले. सध्या तीव्र उन्हाळा असल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागत होता. यासाठी यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशनने वृत्तपत्र विक्रेत्यांना ५० टोप्या वितरित केल्या. फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल चौधरी, फाउंडेशनचे सदस्य संदीप जाधव, सचिन जाधव, कौस्तुभ जोशी, अनुप निकम, रुपेश इंदानी, ओंकार हिरेमठ, प्रथमेश लगारे आणि छत्रपती संभाजीनगर वृत्तपत्र डेपोचे राजाराम पाटील, नामदेव गोंधळी, रवींद्र लाड, संजय बुचडे, संजय चौगुले, बजरंग पाटील, कृष्णात पाटील, परशुराम सावंत उपस्थित होते.