पत्रके आणि पत्रके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रके आणि पत्रके
पत्रके आणि पत्रके

पत्रके आणि पत्रके

sakal_logo
By

99727
कोल्हापूर : ‘कवितेची वही’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित मान्यवर.

‘कवितेची वही’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
कोल्हापूर : सदाशिव पवार-संकपाळ यांच्या ‘कवितेची वही’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन शिवाजी उद्ममनगर येथील शेठ रामभाई सामानी स्मृती हॉलमध्ये झाले. प्राचार्या कमल हर्डीकर, सहित प्रकाशनचे प्रतिनिधी कपिल मुळे प्रमुख उपस्थित होते. प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे अध्यक्षस्थानी होते. श्री. मुळे, संतोष जाधव, विद्याश्री डाके, संजीव संकपाळ यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्या हर्डीकर म्हणाल्या,‘‘अक्षरांच्या आधी पुस्तकाचे मुखपृष्ठ वाचन होते. मानवी जीवनाला संयमाचे बंधन हवे.’’ प्राचार्य लवटे म्हणाले, ‘‘वही हे व्यक्त होण्याचे साधन आहे. कविता ही कधीही न आटणारी नदी आहे. जोपर्यंत कवी मन वाचत नाही, तोपर्यंत कविता तयार होत नाही.’’ पवार-संकपाळ आणि डाके कुटुंबीय उपस्थित होते. उषा मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. संजीव संकपाळ यांनी आभार मानले.
...
न्यू कॉलेजमध्ये मंगळवारी पारितोषिक वितरण
कोल्हापूर : न्यू कॉलेजचा वार्षिक पारितोषिक वितरण आणि गुणगौरव समारंभ मंगळवारी (ता. २) सकाळी नऊ वाजता ऑडिटोरियममध्ये होणार आहे. डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबईचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन के. जी. पाटील उपस्थित राहणार आहेत. प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, उपप्राचार्य डॉ. ए. एम. शेख, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. अमर सासने, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. एस. एन. इनामदार, प्रबंधक श्रीमती एम. वाय. कांबळे यांनी नियोजन केले आहे.
...
न्यू कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर
कोल्हापूर : न्यू कॉलेज येथे रक्तदान शिबिर झाले. राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजतर्फे शिबिराचे आयोजन केले. प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. शिबिरात एन.एस.एस. स्वयंसेवक, एन.सी.सी. कॅडेट्स, विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. संस्थेचे चेअरमन के. जी पाटील यांनी भेट दिली. एन.एस.एस प्रकल्प अधिकारी डॉ. कविता गगराणी, डॉ. के. सी. राठोड, डॉ. आर. एस. किरूळकर, ‘एनसीसी’चे अधिकारी मेजर डॉ. अनिता यादव, लेफ्टनंट प्रा. किरण तिऊरवाडे यांनी आयोजन केले.
...
शाहू कॉलेजमध्ये भित्तीपत्रक स्पर्धेला प्रतिसाद
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन भित्तीपत्रक स्पर्धा घेतली. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डॉ. एम. बी. शेख यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. प्राचार्य डॉ. एल. डी. कदम, उपप्राचार्य प्रो. डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार, डॉ. एस. जे. आवळे उपस्थित होते. परीक्षक म्हणून राजर्षी शाहू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, रुकडी येथील डॉ. उत्तम पाटील, न्यू कॉलेज येथील डॉ. रामचंद्र भास्कर, डॉ. निलेश पवार, चंद्राबाई शांताप्पा शेंडूरे कॉलेज येथील जयश्री बनसोडे होते. ७० स्पर्धक सहभागी झाले. यामध्ये प्रथम- प्रज्ञा गणगे, द्वितीय- असावरी वैद्य, तृतीय- लक्ष्मी सुतार यांनी यश मिळवले. उत्तेजनार्थ बक्षीस आकाक्षा जाधव यांनी मिळवले. प्राचार्य डॉ. कदम यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सरोज (माई) पाटील यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. भित्तीपत्रक समितीच्या प्रमुख डॉ. सबिहा फरास यांनी स्वागत केले. ज्योती कांबळे, डॉ. बी. बी. घुरके यांनी सूत्रसंचलन केले. रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. बी. पिस्ते यांनी आभार मानले.
...