माणगांववाडी दारू कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणगांववाडी दारू कारवाई
माणगांववाडी दारू कारवाई

माणगांववाडी दारू कारवाई

sakal_logo
By

99762
...

माणगांववाडीत ५ हातभट्ट्यांवर कारवाई

५ लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच जणांवर गुन्हे दाखल.


कोल्हापूर, ता. ३०ः हातकणंगले तालुक्यातील माणगांववाडी या गावाजवळील ओढ्यावर असणाऱ्या ५ दारू तयार करणाऱ्या हातभट्ट्यांवर आज कारवाई करण्यात आली. यामध्ये ५ लाख ८ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तेथेच नाश करण्यात आला. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ही कारवाई केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाईसाठी मोहीम सुरू कऱण्यात आली आहे. या अंतर्गत आज माणगांववाडी येथे हातभट्टीवर कारवाई करण्यात आली. सुमारे ४४ पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक गावात आले. त्यांनी ओढ्याकाठी सुरू असणाऱ्या हातभट्ट्यांवर कारवाई केली. तेथील ८ हजार ५२० लिटरचे कच्चे रसायन, २ हजार ९४० लिटर हातभट्टीची दारू व इतर साहित्य असा सुमारे ५ लाख ८ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संजय नरसू बिराणे, सतिश वसंत कांबळे, सुशिल वसंतराव बागडे, भुपाल श्रीपती कांबळे, संजय बाळू कांबळे यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.