
कोल्हापूर जिल्हा व शहर कुस्ती निवड चाचणी
९९९१८
कोल्हापूर : निवड झालेला जिल्हा व शहर संघ. समवेत पदाधिकारी व पंच.
कोल्हापूर जिल्हा, शहर
कुस्ती निवड चाचणी
कोल्हापूर, ता. २ : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने ५ वी सब -जुनिअर मुलींची राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी झाली. अकलूज येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघ सहभागी होत असून निवड चाचणी मोतीबाग तालमीत झाली. पंच म्हणून संभाजी वरुटे यांचे मार्गदर्शनाखाली प्रकाश खोत, बाबा शिरगावकर, प्रा. सिकंदर कांबळे, रविंद्र पाटील, विलास पाटील, सूरज मगदूम, अक्षय डेळेकर व दादू चौगले यानी काम पाहिले. ५ ते ७ मे दरम्यान विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकूल अकलूज (जि. सोलापूर) येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झालेला जिल्हा संघ असा; ४० किलो गट-समृद्धी भुईबंर, इचलकरंजी. ४३ किलो गट-श्रावणी लवटे, कोतोली. ४६ किलो गट-श्रावणी सागांवे, इचलकरंजी. ४९ किलो गट - तृप्ती गुरव, आणूर. ५३ किलो गट - गौरी पाटील, वाघुर्डे. ५७ किलो गट-सोनम खोत, कबणूर. ६१ किलो गट-तनुजा सदाकाळे, कुरुंदवाड. ६५ किलो गट-सिद्धी पाटील, शेळोशी. ६९ किलो गट-प्रतिक्षा बेडगे, कुरूदंवाड. शहर संघ - ४० किलो गट स्पृहा चौगले, कुरूदवाड. ४३ किलो गट-विणा गंधवाले, कोतोली. ४६ किलो गट-साक्षी पाटील, कोतोली.
४९ किलो गट-साक्षी गायकवाड, कुरुंदवाड. ५३ किलो- गटनेहा पाटील, नणूद्रे. ५७ किलो गट -मधुरा कागावळे, माळवाडी. ६१ किलो गट-श्वेता गंधवाले, कोतोली. ६९ किलो गट-राजनदींनी आमणे, इचलकरंजी.