महाराष्ट्र दिन एकत्रितपणे

महाराष्ट्र दिन एकत्रितपणे

राकट देशा, कणखर देशा, महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिन, कामगार दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : एक मे महाराष्ट्र दिन, कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन शहरातील शाळा, महाविद्याये, संस्था, संघटनांतर्फे केले.
...

99954
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठ
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थिनींसह सामूहिक राष्ट्रगीत, राज्यगीत तसेच विद्यापीठ गीत गायन केले. कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले. विद्यार्थी विकास विभागातर्फे विद्यापीठातील प्रशासकीय कर्मचारी महिलांच्या लेझीमपथकाचा कार्यक्रम मुख्य प्रशासकीय भवन इमारतीसमोर झाला. सहभागी महिला कर्मचाऱ्यांचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी अभिनंदन केले.
...
00057
जिल्‍हा दूध संघ (गोकुळ)
कोल्‍हापूर ः महाराष्ट्राला सर्वांगीण समतेच्या प्रस्थापनेच्या लढ्याची आणि समतेची उज्ज्वल परंपरा आहे. भारतीय कामगार चळवळीच्या स्थापनेपासून अनेक व्यक्तींनी आणि विविध कामगार संघटनांनी कामगारांच्या मागण्यांबाबत जो आवाज उठवला तो आज पुन्हा बुलंद करण्याची गरज आहे. आपल्या श्रमातून संपत्ती निर्माण करणाऱ्या कामगार वर्गाने अधिकाधिक सजग होण्याची गरज आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
कामगार संघटना आणि संघ व्‍यवस्‍थापन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ‘गोकुळ’ प्रकल्‍पात कार्यक्रम झाला. यावेळी कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले म्हणाले, ‘गोकुळच्या वाटचालीमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान फार मोलाचे आहे.’ संघाचे बोर्ड सचिव प्रदीप पाटील, डेअरी मॅनेजर अनिल चौधरी, हिमांशू कापडिया, कर्मचारी संघटनेचे लक्ष्मण पाटील, मल्हार पाटील, विश्वास पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक शाहीर सदाशिव निकम यांनी केले. आभार आस्थापना व्यवस्थापक डी. के. पाटील यांनी मानले.
-
12753
कोल्हापूर : महावितरणतर्फे ''ऊर्जावन भरारी'' गुणवंत कामगार सत्कार सोहळ्यात उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराचे वितरण करताना संचालक प्रसाद रेशमे. शेजारी मुख्य अभियंता परेश भागवत, अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर.

महावितरण कोल्हापूर परिमंडळ
कोल्हापूर: ग्राहकांकडून वीज सेवेचे कौतुक ही वीज कर्मचाऱ्यांच्या कामाची पावती आहे, असे संचालक (प्रकल्प तथा मानव संसाधन) प्रसाद रेशमे यांनी येथे केले. महावितरणतर्फे कोल्हापूर परिमंडळात आयोजित ''ऊर्जावन भरारी'' गुणवंत कामगार सत्कार सोहळा व कौटुंबिक स्नेहसंमेलनात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते कोल्हापूर व सांगलीतील तंत्रज्ञ व यंत्रचालक कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले. रोलबॉल विश्वकरंडक स्पर्धेत कास्यपदक प्राप्त भारतीय महिला संघाच्या सहायक प्रशिक्षक अपर्णा महाडिक यांचा सन्मान करण्यात आला.
मुख्य अभियंता परेश भागवत, अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर, अंकुर कावळे, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) शशिकांत पाटील, सहायक महाव्यवस्थापक स्नेहा पार्टे-सोळांकूरकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भूपेंद्र वाघमारे, कार्यकारी अभियंता अभिजीत सिकनीस, सुनिल शिंदे, सुनिल माने, सुधाकर जाधव, प्रशांत राठी, अप्पासाहेब खांडेकर, संतोष कारंडे, पराग बापट, वरिष्ठ व्यवस्थापक सुमन पाटील उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांनी आभार मानले.
--
श्री दत्ताबाळ मिशन डिव्हाईन
संचलित श्रीदत्ताबाळ प्राथमिक विद्यामंदिर व, श्रीदत्ताबाळ इंग्लिश मीडिअम स्कूलतर्फे विश्वस्त वेद देसाई यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. महाराष्ट्र गीत सामुहिकरित्या गायिले. अध्यक्षा पल्लवी देसाई, जनरल सचिव माजी नगरसेवक निलेश देसाई, व्यवस्थापक संदीप डोंगरे, मुख्याध्यापिका रोहिणी शेवाळे, हायस्कूलचे मुख्याध्यापक सचिन डवंग, इंग्लिश मीडिअमच्या मुख्याध्यापिका किर्ती मिठारी, प्रणिता वर्धमाने उपस्थित होते. बालाजी मुंडे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीया सावंत यांनी आभार मानले.
...
प्रायव्हेट हायस्कूल
प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना डेळेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. उपमुख्याध्यापक जी. एस. जांभळीकर, पर्यवेक्षक पी. एम. जोशी आदी उपस्थित होते. सीताराम जाधव यांनी यावेळी महाराष्ट्र गीत सादर केले.
.....
आर्य समाज एज्युकेशन इन्स्टिट्यूट
संचालित शाहू दयानंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, शाहू दयानंद मोफत मराठी शाळा, आर्य समाज बालमंदिर, शा. कृ. पंत वालावलकर वसतिगृह आदी विविध शाखेमार्फत ज्येष्ठ शिक्षक व्ही. सी. प्रभुदेसाई यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. शाहू दयानंद हायस्कूलच्या मुख्यापयापिका कलिकते, ‘बालमंदिर’च्या मेटील, वसतिगृह अधिक्षक अमोल पाटील उपस्थित होते.
...
ताराराणी विद्यापीठ
विद्यापीठाचे सचिव प्राजक्त पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. राष्ट्र गीतानंतर महाराष्ट्र गीत सादर झाले. उषाराजे हायस्कूलमधील एन.एम.एम.एस. परीक्षेमधील शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थिनींचा आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील, उपाध्यक्ष डॉ. एस. एन. पवार, सचिव पाटील यांच्या हस्ते झाला.
.....
वि. स. खांडेकर प्रशाला
शिक्षकेत्तर कर्मचारी भगवान खांबे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. मुख्याध्यापिका नेहा कानकेकर यांनी स्वागत केले. प्रमोद कुलकर्णी यांनी परिचय करून दिला. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये एनएमएमएस, सारथी, पाचवी आणि आठवीतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. माईड ट्रेनर विठ्ठल कोतेकर, माजी मुख्याध्यापक एस. एस. भोसले, पर्यवेक्षक रवींद्र भोई, दगडू रायकर, भरत अलगौंडर, इंद्रायणी पाटील, संजीवनी सावेकर उपस्थित होते. गीत मंच विभागाद्वारे महाराष्ट्र गीत सादर केले. समीर जमादार यांनी सूत्रसंचालन केले. वसंतराव चौगुले विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगराव कांद‌ळकर यांनी आभार मानले.
...
लोहिया हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज
ग्रंथपाल मोहन धडेल उपस्थित होते. एस. एस. मिराशी यांनी स्वागत केले. सहसचिव प्राचार्य एस. एस. चव्हाण अध्यक्षस्थानी होते. धडेल यांनी महाराष्ट्र दिनाच्या निर्मितीचा इतिहास सांगत समृध्द, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्र राज्याचे आपण सुजान नागरिक असल्याचा अभिमान वाटला पाहिजे, असे सांगितले. तसेच कामगाराच्या श्रमाचे महत्व अधोरेखित करत जागतिक कामगार दिन का साजरा केला जातो, याबाबतचा इतिहास सांगितला. ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य ए. एस. सुर्यवंशी, पर्यवेक्षिका एस. बी. पाटील उपस्थित होते. जिमखाना प्रमुख एस. पी. कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
...
विद्यापीठ हायस्कूल
मुख्याध्यापक एस. वाय. कुंभार यांचे हस्ते ध्वजवंदन झाले. राष्ट्रगीत, राज्य गीताचे गायन करण्यात आले. महाराष्ट्र दिन, कामगार दिनाचे महत्व सांगितले. के. एन. गावडे यांनी सूत्रसंचलन केले. उपमुख्याध्यापिका एस. व्ही. रणनवरे, उपप्राचार्य के. व्ही. भानुसे, पर्यवेक्षक बी. डी. गोसावी, एच. एम. गुळवणी उपस्थित होते.
...
गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय
प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी मोरे, दौलत देसाई, उपप्राचार्य एस. एच. पिसाळ, पर्यवेक्षक एस. एन. मोरे, जिमखाना प्रमुख प्रा. एन. आर. कांबळे, प्रा. बी. जे. पाटील उपस्थित होते.
...
प्रबुद्ध भारत हायस्कूल
मुख्याध्यापक संजय अर्दाळकर अध्यक्षस्थानी होते. नववीतील मुलींनी महाराष्ट्राची गौरव गीते गायली. अध्यापक प्रफुल्लचंद मुनसे यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्व, अध्यापक राजू सुर्यवंशी यांनी कामगार दिनाचे महत्व सांगितले. मुनसे यांनी सुत्रसंचालन केले. नंदकुमार पोवार यांनी आभार मानले.
...
अँग्लो उर्दू हायस्कूल शिरोली पुलाची
सुन्नत जमियतचे उपाध्यक्ष हाजी वालेचाँद सनदे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर अध्यक्षस्थानी होते. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत, राष्ट्रभक्तीपर गीते, भाषणे सादर केली. उपाध्यक्ष आदिल फरास, प्रशासक कादरभाई मलबारी, संचालक पापाभाई बागवान, जहाँगिर आत्तार, रफीक शेख, आल्ताफ झांजी, लियाकत मुजावर, फारूक पटवेगार, रफीक मुल्ला, वावासाहेव शेख, मोहिद्दीन मुल्ला, मेहबूब सनदे, अल्लाउद्दीन मुल्ला, माणिक मुल्ला उपस्थित होते. मुख्याध्यापक एम. एच. मोमीन यांनी प्रास्ताविक केले. नसरदी यांनी सूत्रसंचलन केले. शालेय समितीचे चेअरमन मलिक बागवान यांनी आभार मानले.
...
समता हायस्कूल, भोसलेवाडी
महापालिका कर्मचारी वंदना सोनुले यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. गीत मंचातील विद्यार्थीनींनी राष्ट्रगीत, महाराष्ट्र राज्य गीत, झेंडा गीत सादर केले. मुख्याध्यापक शशिकांत सावंत यांनी स्वागत केले. रुबीना अन्सारी अध्यक्षस्थानी होत्या. संस्था सचिव सुंदर देसाई, संचालिका सविता देसाई,डॉ. ए. एम. खान उपस्थित होते. विविध स्पर्धा परीक्षामधील यशस्वी झालेला विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. सुसंस्कार हायस्कूलमधील एम.एम. एम.एस. शिक्षावृत्तीधारक विद्यार्थ्यांचाही सत्कार झाला. सरोजा देसाई यांनी सूत्रसंचालन केले. सरदार आंबर्डेकर यांनी कवायत संचालन केले. मुख्याध्यापक विजय भोगम यांनी आभार मानले.
...
महात्मा फुले हायस्कूल लक्षतीर्थ
तसेच महात्मा फुले हायस्कूल मराठी शाखा लक्षतीर्थ शाळेमध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीत गायिले. दोन्ही शाळेमधील विद्यार्थी-विद्यार्थीनी, पालक, वसाहतीमधील नागरिक उपस्थित होते. मुख्याध्यापक पवार, सचिव उमेश गुरुजी, मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका, इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
...
जय भारत शिक्षण संस्था
संचालित डॉ. श्रीधर सावंत विद्या मंदिर, जय भारत हायस्कूलतर्फे सुमित्रा जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. एम. वाय. निकाडे यांनी महाराष्ट्र दिन, कामगार दिनाचे महत्त्व सांगितले. जाधव यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका अश्विनी पाटील उपस्थित होत्या. वैभव कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. अरुण कुंभार यांनी यांनी आभार मानले.
...
सौ. सुनितादेवी सोनावणे हायस्कूल
संस्थापक अध्यक्ष जी. एस. पाटील (बापू) यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. मुख्याध्यापक धनाजी बेलेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
...
तिरंगा महलवर विद्युत रोषणाई
राष्ट्रीय सेवा समिती, मुस्लिम पंचायत, खलिफा हजरत उमर फारुक आंतरराष्ट्रीय फाउंडेशन, अेम. एज्युकेशन कौन्सिल संस्थाचे मुख्यालय असलेल्या तिरंगा महल वास्तूरवर महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला विद्युतरोषणाई केली होती, अशी माहिती मुस्लिम पंचायतचे अध्यक्ष फारुक एम. कुरेशी यांनी पत्रकाद्वारे दिली.
...
ीजिल्हा परिषद
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंहचव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. जिल्हा परिषद कलामंचतर्फे राज्यगीत सादर केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी व्ही. टी. पाटील , जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे, कार्यकारी अभियंता (बांधकाम) सचिन सांगावकर, कार्यकारी अभियंता अशोक धोंगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दिपक घाटे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अरुणा हसबे, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
...
फक्त फोटो : 00047
कोल्हापूर : जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना बालकल्याण संकुल येथे ज्येष्ठ विश्वस्त सुरेश शिपूरकर यांचे हस्ते ध्वजवंदन झाले. मानद कार्यवाह श्रीमती पद्मजा तिवले, सहमानद कार्यवाह एस. एन. पाटील, जीवन आशय केंद्राच्या शैलजा टोपकर, अधीक्षक पी. के. डवरी, सचिन माने, द्रौपदी पाटील, नजिरा नदाफ, टी. एम. कदम, मीना कालकुंद्रे, कर्मचारी, प्रवेशित मुले-मुली उपस्थित होते.
...
प्रिन्सेस इंदुमतीदेवी हायस्कूल फॉर गर्ल्स
कार्यकारी सदस्या हर्षदा मेवेकरी यांनी ध्वजवंदन केले. मुख्याध्यापिका शैलजा भोसले, पर्यवेक्षिका वर्षा पाटील आदी उपस्थित होते. एनएमएमएस परीक्षेतील यशस्वी सिद्धी कांबळे, श्‍वेता बैरागी, चंद्रलेखा सावंत, स्वराली पाटील, मधुरिमा पाटील, आराधना बोधले, प्रार्थना फल्ले, संचिता शेट्टी या विद्यार्थीनींचा सत्कार झाला. जिमखाना प्रमुख सीमा सुर्यवंशी यांनी आभार मानले.
...
भारतीय कम्युनिस्ट पक्ष
मुकुंद वैद्य यांच्या हस्ते ध्वज फडकवला. वैद्य म्हणाले, ‘‘कामगारांनी संघर्ष करून, आपले रक्त सांडून हक्काची रजा, कामाचे आठ तास रविवारची सुट्टी असे हक्क मिळवले; पण सध्याचे सरकार मालक धार्जिण धोरण राबवित आहे. कामाचे तास बारा झाले, कधी पण काम असे, कामगारांची पिळवणूक सुरू आहे या विरुद्ध संघर्ष करावा लागेल.’’ बाबा ढेरे यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत आंबी यांनी ध्वजगीत गायिले. कामगार एकजुटीचा विजय असो, एक मे कामगार दिन चिरायु होवो, इन्कलाब जिंदाबाद या घोषणा दिल्या. विविध कामगार संघटना त्यामध्ये गोकुळ, लक्ष्मी लाडा पंप, महाराष्ट्र कृषी महामंडळ, फेरीवाले युनियन, महाराष्ट्र मशीन, महाराष्ट्र इंजिनियरिंग, मारव्हलयस मेटल, यूटीपी युनिट या कामगार संघटनांची प्रतिनिधी उपस्थित होते. दिलीप पवार, रघुनाथ कांबळे, आशा बर्गे, एस. बी. पाटील, बाळासाहेब कांबळे, सिद्धी सुतार, दिलदार मुजावर, शाहीर सदाशिव निकम, सुरेश मोरे, प्रमोद हुपरी, विजय अकोळकर, ॲड. बाळासाहेब पवार, व्ही. डी पाटील, रमेश वडणगेकर, आनंदराव परुळेकर आदी उपस्थित होते. कुंडलिक एकशिंगे यांनी आभार मानले.
----
ज्येष्ठ नागरिक मंच
कंदलगाव ः राजेंद्र नगर येथील डी. आर . भोसले नगर ज्येष्ठ नागरिक मंचच्या वतीने पारिसरातील सफाई कामगार, पाणीपुरवठा व वीज वितरण कामगारांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर यांचे हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. एस. व्ही. कशाळकर, अजित मंडलिक, गौरी सुर्यवंशी, संध्या वाणी, सुखदेव वाळवेकर, सुरेश जत्राटकर, एम आर कांबळे, अमृतराव भोसले उपस्थित होते.प्रास्ताविक सुभाष वाणी यांनी केले


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com