भारतीय जनता पार्टीची बुथ सशक्तीकरण बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय जनता पार्टीची बुथ सशक्तीकरण बैठक
भारतीय जनता पार्टीची बुथ सशक्तीकरण बैठक

भारतीय जनता पार्टीची बुथ सशक्तीकरण बैठक

sakal_logo
By

gad27.jpg
99994
नेसरी : भारतीय जनता पार्टीच्या बैठकीत समरजित घाटगे यांनी मार्गदर्शन केले. प्रकाश चव्हाण, शिवाजी पाटील, संग्राम कुपेकर उपस्थित होते.
--------------------------
भारतीय जनता पार्टीची
बुथ सशक्तीकरण बैठक
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : भारतीय जनता पार्टीचे लोकसभा प्रवास योजना बुथ सशक्तीकरण अभियान सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून शक्ती केंद्र प्रमुख, प्रभारींची बैठक झाली. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील साखरे मंगल कार्यालयात ही बैठक झाली.
जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) समरजित घाटगे यांनी संघटनात्मक कामाविषयी मार्गदर्शन केले. माजी राज्यमंत्री भरमू पाटील, भाजपच्या राज्य कार्यकारणीचे सदस्य शिवाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अॅड. हेमंत कोलेकर, संग्राम कुपेकर, अनिता चौगुले, सचिन बल्लाळ, संदीप नाथबुवा यांचीही भाषणे झाली. गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीवर बिनविरोध निवड झालेले भावकू गुरव, उदय देशपांडे, रवी शेंडूरे यांचा सत्कार केला.
गोडसाखरचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, अनिल शिवणगेकर, सुधीर कुंभार, नामदेव पाटील, अशोक पांडव, शांताराम पाटील, प्रताप सूर्यवंशी, संदीप पाटील, निलांबरी भुईंबर, संजय कांबळे, दीपक पाटील, जयवंत सुतार, विशाल बलाळ, राम पाटील, भरमू पाटील, संतोष नाईक, युवराज पाटील, संतोष पेडणेकर आदी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी आभार मानले.