आजरा संघासाठी दुरंगी लढत

आजरा संघासाठी दुरंगी लढत

आजरा संघासाठी दुरंगी लढत
१९ जागांसाठी ४२ जण रिंगणात; १३ तारखेला मतदान
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ३ : आजरा तालुका शेतकरी संघासाठी दुरंगी लढत होणार असल्याचे माघारीच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले. १९ जागांसाठी ४२ जण निवडणूक रिंगणात राहिले आहेत. १०० जणांनी माघार घेतली आहे. सत्ताधारी रवळनाथ शेतकरी विकास आघाडी विरोधात विरोधी रवळनाथ परिवर्तन शेतकरी विकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. अपक्ष चार जण निवडणूक रिंगणात आहेत.
कोरोना व अन्य कारणांच्यामुळे निवडणूक लांबणीवर पडली होती. संघासाठी १३ तारखेला मतदान होणार असून १४ तारखेला निवडणूक निकाल जाहीर होईल. तालुका संघासाठी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोन्हीकडून प्रयत्न झाले. पण जागा वाटपामुळे समझोता होऊ शकला नाही. त्यामुळे दोन्‍ही आघाड्यांच्या नेतेमंडळीकडून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधारी रवळनाथ शेतकरी विकास आघाडीचे नेतृत्व जिल्हा बॅंकेचे संचालक सुधीर देसाई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई करीत आहेत. विरोधी रवळनाथ शेतकरी विकास परिवर्तन आघाडीचे नेतृत्व अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी करीत आहेत.
------------
१२ संचालक रिंगणात
या निवडणुकीमध्ये सत्ताधारी गटाने ११ जुन्या संचालकांना संधी दिली आहे. तर विरोधी आघाडीने एका संचालकाला संधी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com