दारू जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारू जप्त
दारू जप्त

दारू जप्त

sakal_logo
By

बांद्यात ११ लाखांची दारू जप्त
बांदा, ता. २ ः बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी गुजरात येथील दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अकरा लाख रुपयांच्या दारूसह एकूण ३१ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आज दुपारी दोनच्या सुमारास बांदा तपासणी नाक्यावर करण्यात आली. प्रदीपकुमार श्रीभगवती प्रसाद, मोहम्मद शबीर वहीदीभाई इंद्राशी (दोघे रा. राजकोट) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ट्रकही जप्त करण्यात आला. याबाबतची फिर्याद बांदा हवालदार प्रसाद पाटील यांनी दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सांगितले, की बांदा पोलिसांनी येथील तपासणी नाक्यावर सापळा रचला आणि ही कारवाई केली.