क्रीडा क्षेत्रातील व्यवसायिक संधी

क्रीडा क्षेत्रातील व्यवसायिक संधी

क...
क...
क्रीडा क्षेत्रातील करिअरचा
भाग १
------

ग्रेस गुण, व्यवसायिक संधी अन् सरकारी नोकरी
शालेय वयातच पायाभरणी हवी; शैक्षणिक पात्रता खेळाडूंकडे असणे आवश्यक

मालिका लीड
क्रीडा क्षेत्राकडे निव्वळ आवड किंवा फावल्या वेळातील उद्योग या दृष्टिकोनातून न पाहता या क्षेत्रातील विविध करिअरच्या संधीचे महत्त्व विद्यार्थ्यांसह पालकांनाही पटलेले दिसते. अनेक व्यावसायिक स्पर्धांच्या प्रसिद्धी व उत्पन्नामुळे क्रीडा क्षेत्राकडे करिअर म्हणून अधिक गांभीर्याने बघितले जाते. बदललेल्या या सकारात्मक दृष्टिकोनामुळे क्रीडा संबंधित अनेक व्यावसायिक संधी या निमित्ताने निर्माण झाल्या आहेत. त्यावर प्रकाश टाकणारी वृत्तमालिका आजपासून...

सुयोग घाटगे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : क्रीडा क्षेत्रातील करिअरची पायाभरणी शालेय वयातच सुरू होते. या वयोगटातील व्यायाम व नियमितता, युवावस्थेतील शिस्तबद्धपणा व भविष्यकाळात शिक्षणाच्या जोडीला अथवा क्रीडा क्षेत्रातील आपल्या आवडीच्या विषयात प्राविण्यासह विशेष करिअर करता येते. क्रीडा क्षेत्र ही वैयक्तिक करियर घडवणारे असले तरीही शालेय स्तरापासून संस्थात्मक स्वरुपात सहकार्य व मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. संपूर्ण शैक्षणिक काळामध्ये निपुण खेळाडूला ग्रेस गुण दिले जातात. यामुळे शालेय जीवनापासून ते पदवी शिक्षणापर्यंत याचा फायदा होतो. विद्यापीठ स्तरापासून राज्य व केंद्र स्तरापर्यंत क्रीडानुकूल प्रयत्न होत असल्यामुळे विशेष प्राविण्यप्राप्त खेळाडू शासकीय सेवेसाठी विविध पदावर पात्र ठरत आहेत.
राष्ट्रीय स्तरावर ‘स्पोर्टस् ऑथोरिटी ऑफ इंडिया’ (साईचे)’ महत्त्वपूर्ण स्थान व योगदान राहिले आहे. ''साई''ची स्थापना केंद्र सरकारतर्फे क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी झाली आहे. दिल्ली येथे मुख्यालय असण्यासह बंगळूरु, भोपाळ, गांधीनगर, कोलकाता, चंदिगढ, गुवाहाटी, इंफाळ, लखनौ, मुंबई व सोनेपत येथे प्रादेशिक केंद्रे आहेत. याशिवाय देशातील विविध ठिकाणी असणाऱ्या २३ क्रीडा गुण अव्वलता केंद्रे व ६६ प्रशिक्षण केंद्रे व ३० विस्तारित क्रीडा केंद्रांच्या माध्यमातून ‘साई’चे काम चालते.
विशेष प्रावीण्यामुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पदकप्राप्त खेळाडू विविध सरकारी नोकरीसाठी पात्र ठरतो. सरकारने खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलेली ही संधी खेळडूंना प्रेरित करणारी आहे. यातच अ, ब , क व ड वर्ग अशी वर्गवारी करण्यात आली आहे. मात्र, यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खेळाडूंकडे असणे आवश्यक आहे. सरकारी क्षेत्रांतर्गत संरक्षण सेवा, रेल्वे, दूरसंचार, बँका, वित्तीय सेवा, विभिन्न सरकारी सेवा देणाऱ्या संस्थाचा यामध्ये सहभाग आहे.

चौकट
खेळाडूंसाठी विशेष व्यापसपीठ
अनके खासगी उद्योग समूहही खेळाडूंसाठी विशेष व्यापसपीठ उपलब्ध करून देत आहेत. खेळाडू दत्तक योजना राबवून अनेक साखर कारखाने, दूध संस्था खेळाडूंच्या पाठीशी उभारत आहेत. यामुळे नोकरीविषयी अनेक दालने खेळाडूंना खुली होताना दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com