स्वयं रोजगार योजनांतून ३१ हजार जणांच्या हाताला काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वयं रोजगार योजनांतून ३१ हजार जणांच्या हाताला काम
स्वयं रोजगार योजनांतून ३१ हजार जणांच्या हाताला काम

स्वयं रोजगार योजनांतून ३१ हजार जणांच्या हाताला काम

sakal_logo
By

मालिका लोगो
उद्योग क्षेत्राची वाटचाल ः भाग-२

३१ हजार जणांच्या हाताला काम
स्वयंरोजगार योजना; जिल्ह्यात १४२० कोटींची गुंतवणूक, ४ हजार लाभार्थींना बळ

संतोष मिठारी : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ःजिल्हा उद्योग केंद्रातर्फे स्वयंरोजगाराच्या विविध योजना राबविल्या जातात. त्यातील पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, बीज भांडवल योजनेच्या माध्यमातून २०१९ पासून आतापर्यंत जिल्ह्यातील ४ हजार लाभार्थींना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यास बळ मिळाले. त्यांच्या माध्यमातून १४२० कोटींची गुंतवणूक होवून ३१ हजार जणांच्या हाताला काम मिळाले आहे.
या योजनांच्या माध्यमातून लाभार्थी युवक, युवतींनी गारमेंट, सर्व्हिस सेंटर, इंजिनिअरिंग वर्कशॉप, ट्रान्‍स्‍पोर्ट व्हेईकल, फूड अँड बेव्हरेज, सीएनसी अँड व्हीएमसी शॉप, मशीन शॉप, काजू प्रक्रिया, ग्राईडिंग मिल आदी उद्योग-व्यवसायांची उभारणी केली. त्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जिल्ह्यातील ३१ हजार जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. उद्योजकता तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत ३५०० युवक-युवतींनी विविध उद्योग-व्यवसायांबाबतचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यात ब्युटी पार्लर, हार्डवेअर नेटवर्किंग, इनर्व्हटर दुरुस्ती, सीएनसी आणि व्हीएमसी मशीन आदी प्रशिक्षणांचा समावेश होता.
.......
चौकट
सात नवे क्लस्टर होणार
जिल्ह्यात आजरा घनसाळ राईस क्लस्टर (आजरा), टेक्सटाईल क्लस्टर (रेंदाळ), फॅब्रिकेशन, गारमेंट क्लस्टर (कागल), टेक्सटाईल क्लस्टर (शिरोळ), सिल्व्हर क्लस्टर (हुपरी), मेटल प्रोसेसिंग क्लस्टर (कागल) पुढील दोन वर्षांत सुरू होणार आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये गारमेंट क्लस्टर (इचलकरंजी), कॉटन फॅब्रिक क्लस्टर (आळते), प्रिटिंग क्लस्टर (इचलकरंजी), काजू प्रक्रिया क्लस्टर (आजरा), टेक्सटाईल क्लस्टर (अब्दुललाट) सुरू झाले आहेत.
.......
चौकट
योजनानिहाय चित्र
योजना*लाभार्थी (शेकड्यात)*गुंतवणूक (कोटींमध्ये) रोजगारनिर्मिती (हजारांत)
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम*२४००*९६०*१९ हजार
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम*१२००*३६०*१० हजार
बीजभांडवल योजना*४००*१००*२ हजार
.......
चौकट
वर्षाला ४ हजार कोटींची निर्यात
जिल्ह्यातील विविध उद्योग, व्यवसायांच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे ४ हजार कोटींची निर्यात होते. त्यात वाहनांचे सुटे भाग, इंजिनिअरिंग, टेक्सटाईल, साखर, गूळ, आदींचा समावेश आहे. विदेशी व्यापार निगमच्या सहकार्याने जिल्ह्याचा निर्यात आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. याअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्राने उद्योजक, व्यावसायिकांच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. पुढील तीन महिन्यांत आराखडा तयार करण्याचे नियोजन आहे.
.....
ठळक चौकट
योजनांचे १० वर्षांतील तालुकानिहाय लाभार्थी
तालुका*स्थानिक महामंडळे*विविध महामंडळे
शाहूवाडी*३*६५
पन्हाळा*१५*३६१
हातकणंगले*२६*२६८
शिरोळ*२३*१६०
करवीर*४०*९५०
गगनबावडा*१*१२
राधानगरी*१७*१८७
कागल*२०*३१५
भुदरगड*१*१५०
आजरा*१०*७८
गडहिंग्लज*९*४८
चंदगड*४*१२०
एकूण*१६९*२७१४
....
कोट
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, बीजभांडवल व इतर योजनांच्या माध्यमातून नवयुवक-युवतींना स्वतःचा उद्योग, व्यवसाय उभारून रोजगार निर्मितीची संधी आहे. त्यांनी संबंधित योजनांचा लाभ घेऊन उद्योग, व्यवसायाची उभारणी करावी. विविध योजनांचा युवक-युवतींना लाभ देण्यात जिल्हा राज्यात आघाडीवर आहे.
-सतीश शेळके, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र
............
जिल्हा नकाशा वापरणे
जिल्हा उद्योग केंद्र कर्जयोजनेचे लाभार्थी
शाहूवाडी-४२
पन्हाळा-११७
हातकणंगले-४२८
शिरोळ-१८५
करवीर-३८९
गगनबावडा-५
राधानगरी-११
कागल-१०५
भुदरगड-२
आजरा-२२
गडहिंग्लज-८६
चंदगड-३२
एकूण-१४२४