कबड्डी स्पर्धेत जयहिंदचा संघ विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कबड्डी स्पर्धेत जयहिंदचा संघ विजेता
कबड्डी स्पर्धेत जयहिंदचा संघ विजेता

कबड्डी स्पर्धेत जयहिंदचा संघ विजेता

sakal_logo
By

ich31.jpg
00183
इचलकरंजी : स्पर्धेत सहभागी खेळाडुंना जहिंद मंडळाचे अध्यक्ष सत्यनारायण डाळया यांच्याहस्ते गौरवले.

कबड्डी स्पर्धेत जयहिंदचा संघ विजेता
इचलकरंजी : कुपवाड येथील महालक्ष्मी क्रिडा मंडळ व सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे ७० किलो वजनी गटातील निमंत्रितांच्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये अंतिम सामना जयहिंद क्रिडा मंडळ व शिरोळच्या बाल शिवाजी क्रीडा मंडळात झाला. जयहिंद मंडळाने शिरोळच्या संघावर वीस गुणांनी विजय मिळवून विजेतेपद पटकावले. सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून जयहिंद मंडळाचा प्रेमनाथ काळे यास गौरवले. त्यासोबत भडगांव आजरा येथे झालेल्या पुरुष खुला गट स्पर्धेमध्ये जयहिंद मंडळास तृतीय क्रमांक मिळाला. स्पर्धेत सहभागी खेळाडुंचा सत्यनारायण डाळया यांच्याहस्ते गौरव केला. उदय चव्हाण, दिलीप ढोकळे, राजेंद्र चौगुले, शशिकांत पाटील आदी उपस्थित होते.
--------------
ich36.jpg
00184
इचलकरंजी : गुरुकुल ॲकॅडमीतर्फे स्वानंद ढेरे याचा सत्कार करण्यात आला.

स्वानंद ढेरे याचा सत्कार
इचलकरंजी : गुरुकुल अकॅडमीचा विद्यार्थी स्वानंद ढेरे याने जेईई मेन परीक्षेमध्ये ९९.२५ टक्के गुण मिळवून इचलकरंजी शहरांमध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला. ‌अतिशय खडतर परिस्थितीतून आणि पितृछत्र हरपलेले असताना, केवळ जिद्द आणि कष्ट याच्या जोरावर स्वानंदने हे यश मिळवले आहे. त्याचा ॲकॅडमीतर्फे सत्कार केला.
---------------
नरदे हायस्कूलमध्ये उन्हाळी शिबिर
इचलकरंजी : नांदणी येथील ताराबाई अण्णासाहेब नरदे हायस्कूलमध्ये प्रशाला तसेच जैन संघटनेमार्फत स्मार्ट गर्ल कार्यशाळा व उन्हाळी वर्ग शिबीरास प्रारंभ झाला. उद्‍घाटन अवधूत पोतदार व मेघा पोतदार यांनी केले. काका भगाटे, मुख्याध्यापिका पी. पी. देसाई, एस. बी. जैनापुरे, सुनील मिरजकर, वैशाली देसाई, रमेश पाटील, संजय पाटील उपस्थित होते.