
कौशल्य ज्ञानाच्या कराराने डॉ. कुराडेंचा वाढदिवस
00249
गडहिंग्लज : वाढदिवसानिमित्त डॉ. अनिल कुराडे व बिनादेवी यांचा सत्कार प्रेमला खोत यांच्याहस्ते झाला. या वेळी अॅड. दिग्विजय कुराडे, के. जी. पाटील, जे. वाय. बारदेस्कर उपस्थित होते.
कौशल्य ज्ञानाच्या कराराने
डॉ. कुराडेंचा वाढदिवस
गडहिंग्लज, ता. ४ : येथील शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांचा वाढदिवस उत्साहात झाला. दरम्यान, वाढदिवसाचे औचित्य साधून कोल्हापुरातील प्रथम एज्युकेशन फाउंडेशन व शिवराज विद्या संकुलामध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्य ज्ञानाला प्राधान्य देण्यासाठी सामंजस्य करार झाला.
महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. प्रेमला खोत, रमजान अत्तार व संस्थेचे उपाध्यक्ष के.जी.पाटील, जे.वाय.बारदेस्कर, अॅड. दिग्विजय कुराडे, संचालक के. बी. पेडणेकर, शंकर नंदनवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. वाढदिवसानिमित्त डॉ. कुराडे यांचा सपत्नीक सत्कार प्रेमला खोत यांच्याहस्ते झाला. ११ व १२ वी आर्टस, कॉमर्स व बी. ए. च्या विद्यार्थ्यांना पारंपारिक शिक्षणाबरोबरच जीवनात सक्षम होण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्यज्ञान मोफत मिळावे म्हणून शिवराजने सामाजिक बांधिलकीतून हा करार केल्याचे सांगितले. या वेळी डॉ. कुराडे, प्रा. बिनादेवी कुराडे, प्रथम एज्युकेशनचे संचालक सुधाकर भदरगे, प्रा. विक्रम शिंदे उपस्थित होते.
डॉ. कुराडे म्हणाले, ‘‘अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे व सर्व पदाधिकारी यांनी दिलेली जबाबदारी सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करीत आहे. ही संस्था नावारूपास येण्यासाठी अनेकांनी मोलाची साथ दिली आहे.’’ भदरगे, अत्तार, अॅड. कुराडे, पेडणेकर, कुराडे, बाळासाहेब सावंत, डॉ. सुधीर मुंज, डॉ. श्रद्धा पाटील यांची भाषणे झाली. शिवराज इंग्लिश स्कूल व विविध संस्थांनी डॉ. कुराडे यांचा सत्कार केला. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांनी स्वागत केले. डॉ. श्रद्धा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रवी खोत यांनी आभार मानले.