पत्रके काही पत्रके पत्रके पत्रके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रके काही पत्रके पत्रके पत्रके
पत्रके काही पत्रके पत्रके पत्रके

पत्रके काही पत्रके पत्रके पत्रके

sakal_logo
By

बौद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम
कोल्हापूर : जिल्हा बौद्ध अवशेष व विचार संवर्धन समिती, विविध बौद्ध धम्म संघटनेमार्फत तथागत गौतम बुद्धांची २५६७ वी जयंती मसाई पठार, पांडवदरा पन्हाळा येथे पाच मे रोजी बौद्ध पौर्णिमेदिनी, तर पोहाळे बौद्ध लेणी येथे उद्या (ता. ४) तसेच पळसंबा/ऐणारी बौद्ध लेणी येथे साजरी होणार आहे. यानिमित्त ‘जिल्हा प्राचीन बौद्ध लेणी : संवर्धनाचे ३० वर्षे’ आणि ‘कोल्हापूर, कराड, सांगली प्राचीन बौद्ध लेणी’ या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. बौद्ध बांधवांनी पंचशिलाच्या अहिंसक मार्गाने आणि पंचशील ध्वजासहीत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा बौद्ध अवशेष व विचार संवर्धन समिती, विविध बौद्ध धम्म संघटनेने केले आहे.
...
00337
कोल्हापूर : ‘ती... आठवते तेव्हा’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित मान्यवर.

‘ती... आठवते तेव्हा’ पुस्तकाचे प्रकाशन
कोल्हापूर: ‘‘पती-पत्नीच्या भावोत्कट प्रेमाचा प्रत्ययकारी आविष्कार म्हणजेच बी. एन. बंदी लिखित ‘ती... आठवते तेव्हा’ हे पुस्तक होय,’’ असे उद्‌गार डॉ. प्रकाश गुणे यांनी काढले. बिरादर प्रकाशनतर्फे ‘ती... आठवते तेव्हा’ पुस्तकाचे प्रकाशन झाले झाले. बिरादर प्रकाशनचे बाळ कालेकर, डी. जी. खोंदरे, डॉ. शामराव देसाई, सुजाता देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. गुणे यांच्या हस्ते राहुल गुणे, डी. जी. खोंदरे, शामराव देसाई व मान्यवरांच्या उपस्थित प्रकाशन झाले. अनिकेत बंदी, अभिजित बंदी, अनुष्का बंदी यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार झाला. यश प्रिंटर्सचे गंगाधर दिवेकर, मुखपृष्ठ करणारे शिवाजी निगडे यांचाही सत्कार झाला. कवी अशोक भोईटे यांनी निवेदन केले. सौ. बंदी यांनी आभार मानले.
...
‘गर्जा महाराष्ट्र माझा’ कार्यक्रमाला प्रतिसाद
कोल्हापूर : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आयोजित ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ लोकसंस्कृती सांगणारा कार्यक्रम शाहू स्मारक येथे झाला. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजन केले होते. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झाला. गीत राधाई कलामंच राधानगरी यांनी उत्तम सादरीकरण केले. अभिनेते अनंत काळे, सोनाली राजपुत, हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील, नृत्य परिषद पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सागर बगाडे उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शुभेच्छा दिल्या.
...
00349
कोल्हापूर : डॉ. सुकुमार बिंदगे, डॉ. पद्मश्री बिंदगे-जवकर यांच्या सन्मानप्रसंगी मान्यवर.

डॉ. बिंदगे, डॉ. पद्मश्री बिंदगे यांचा सन्मान
कोल्हापूर : जनरल प्रॅक्टिस असोसिएशनतर्फे वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि धन्वंतरी पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. सुकुमार बिंदगे, डॉ. पद्मश्री बिंदगे-जवकर यांचा ‘जीपीए’चे मानचिन्ह देऊन सत्कार झाला. हॉटेल वृषाली सभागृहात कार्यक्रम झाला. ‘जीपीए सीएमई’ कार्यक्रमात कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे चेअरमन डॉ. सूरज पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘जीपीए’चे अध्यक्ष डॉ. राजेश सातपुते अध्यक्षस्थानी होते. कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या मुख्य संचालक डॉ. रेश्मा पवार प्रमुख उपस्थित होत्या. डॉ. विनोद घोटगे, संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवराज देसाई, डॉ. उद्यम व्होरा, डॉ. महाजन, डॉ. राजेश कुंभोजकर, डॉ. हरीष नांगरे, डॉ. प्रशांत खुटाळे, डॉ. शिवराज जितकर, डॉ. संदीप पाटील, ‘जीपीए’चे कार्यकारी मंडळ उपस्थित होते. ‘जीपीए’चे सचिव डॉ. हरिष नांगरे यांनी सूत्रसंचालन केले.
...
फक्त फोटो : 00353
कोल्हापूर : मराठी हिंदी, कोकणी चित्रपट, नाटकांचे मेकअप आर्टिस्ट प्राण मनोहर चौगले यांना जय गंगातारा सांस्कृतिक कला संघटना सांगली यांच्या वतीने कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धनंजय पाठक, अमरसिंह देशमुख, कलावंत, सिने कलाकार उपस्थित होते.
...
फक्त फोटो : 00366
कोल्हापूर : बजापराव माने तालीम संस्थेतर्फे अडीच हजार शेणी स्मशानभूमीस दान केल्या. संजय गेंजगे, चंद्रमोहन पिसाळ, धनाजी माने, शिवाजी भोसले, सुनील शिंदे, जयपाल भक्ते, दिलीप मुळीक, विलास कुराडे, बाळासाहेब निकम, सुधीर शिंदे, अनिल माने, श्री. बाचुळकर, संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
...
दोन कॉलम

कंत्राटीकरणविरोधी जागृती
आंदोलन करण्याचा निर्धार

कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा मेळावा

कोल्हापूर, ता. ३ : कंत्राटीकरण विरोधात जिल्ह्यात जागृती करण्याचा आणि संघर्ष करण्याचा निर्णय मेळाव्यात घेतला. ‘कामगार संघटना संयुक्त कृती समिती’तर्फेच्या कंत्राटीकरण विरोधी जागृती संघर्ष मेळावा श्रमिक कार्यालय येथे घेतला.
कंत्राटीकरण विरोधी एक लाख पत्रके कंत्राटी कामगारांपर्यंत घेऊन जाण्याचा निर्णय झाला. सोमवारी (ता. २९) महाधरणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरून कायम भरती नाकारणाऱ्या कंत्राटी भरतीच्या ‘जीआर’ची जाहीर होळी करण्याचा निर्णय झाला. दिलीप पवार यांचा दिलीप जगताप यांनी सत्कार केला. अनिल लवेकर यांनी ‘खा-उ-जा’ धोरणा विरुद्ध लढण्याचे आवाहन त्यांनी केले. अतुल दिघे म्हणाले, ‘‘मोदी सत्तेवर आल्यापासून कंत्राटी कामगारांच्या आत्महत्या तिप्पट झाल्या, असे अभ्यासू लोक सांगत आहेत.’ पवार यांनी संघर्षाशिवाय आता मार्ग नसल्याचे सांगितले. वसंत डावरे (शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटना), प्रकाश कांबरे (श्रमिक महासंघ, एक्टू), सुधाकर पिसे (भारतीय कामगार कर्मचारी महासंघ), एस. बी. पाटील, सदाशिव निकम (आयटक), विवेक गोडसे (सीटू) यांचीही भाषणे झाली.
...