बनावट दारु जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनावट दारु जप्त
बनावट दारु जप्त

बनावट दारु जप्त

sakal_logo
By

00373
गडहिंग्लज : राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी व कर्मचाऱ्यां‍च्या पथकाने नांदवडेतून गोवा बनावटीच्या दारुचे २७ बॉक्स जप्त केले.
------

नांदवडे येथे गोवा
बनावटीची दारु जप्त

चंदगड, ता. ३ : नांदवडे (ता. चंदगड) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून गोवा बनावटीच्या दारुचे २७ बॉक्स जप्त केले. १ लाख ५५ हजार रुपये जप्त दारुची किंमत आहे. मंगळवारी (ता. २) रात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी परशराम मळवीकर (वय ३२, रा. नांदवडे) याला ताब्यात घेतले आहे.
याबाबतची माहिती अशी, कर्नाटक राज्य विधानसभेची निवडणूक सुरु आहे. यामुळे दारुच्या बेकायदा वाहतुकीवर निर्बंधासाठी विविध ठिकाणी तपासणी नाके उभारली आहेत. या पार्श्‍वभूमीवर अधीक्षक रवींद्र आवळे यांच्या आदेशाने मंगळवारी चंदगड तालुक्यात गडहिंग्लजच्या उत्पादन शुल्कचे पथक गस्त घालत असताना नांदवडे गावात गोवा बनावटीच्या दारुचा साठा असल्याची बातमी कळाली. त्यानुसार गावच्या हद्दीत ‘कोंभेटेक’ नावाच्या शेतात गोवा बनावटीच्या वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या दारुचे २७ बॉक्स मिळून आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन मळवीकर यास ताब्यात घेतले आहे.
अधीक्षक रवींद्र आवळे, उपअधीक्षक आर. एल. खोत यांच्या मार्गदर्शनाने गडहिंग्लजचे निरीक्षक एम. एस. गरुड, चंदगडचे उपनिरीक्षक किरण पाटील, एल. एन. पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक एस. आर. ठोंबरे, बी. ए. सावंत, जी. एस. जाधव, एस. बी. चौगुले, ए. टी. थोरात, मुकेश माळगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. उपनिरीक्षक किरण पाटील अधिक तपास करीत आहेत.