पाणीपुरवठा

पाणीपुरवठा

ए, बी, ई वॉर्डच्या
काही भागात कमी
दाबाने पाणीपुरवठा

कोल्हापूर ः पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातील गळती दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू झाला असला तरी ए, बी, तसेच ई वॉर्डमधील काही भागात आजही कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. अशा ठिकाणी दिवसभरात ९ टॅंकरच्या २२ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.
सोमवारी गळती दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद होता. मंगळवारी सकाळपासून पुरवठा सुरू केला. पण, टाकी व्यवस्थित भरल्या नसल्याने त्यादिवशी अनेक भागात पाणीच आले नव्हते. सायंकाळनंतर काही भागात कमी दाबाने पाणी आले. बुधवारी सकाळीही कमी दाबानेच पाणीपुरवठा झाला. उंचावरील भागात पाणी पोहचले नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्यासाठी टॅंकर मागवले. नऊ टॅंकरनी विविध भागात २२ फेऱ्या करून पाणी पोहचवले. गुरुवारी मात्र सर्व भागात व्यवस्थित पाणीपुरवठा होईल असे जलअभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com