आंबा आवक घट भाव तेजीत

आंबा आवक घट भाव तेजीत

आवक घटल्याने कोकणी हापूस तेजीत
दाक्षिणात्य आंब्याची आवक वाढली; तुलनेत दर कमी असल्याने सर्वसामान्यांकडून पसंती

कोल्हापूर, ता. ३ ः हौशी खवय्यांसाठी दरवर्षी आकर्षणाचा विषय असलेला कोकणी हापूस आंब्याची आवक कमालीची घटली आहे. परिणामी गतवर्षीच्या तुलनेत कोकणी हापूसचे भाव दुप्पट झाले आहेत. यावर पर्याय म्हणून दाक्षिणात्य आंब्याची आवक वाढली असून, कोकणी हापूसच्या तुलनेत भाव कमी असल्याने सर्वसामान्यांकडून दक्षिणात्या आंब्याला पसंती वाढत आहे. मार्केट यार्डातील घाऊक फळ बाजारपेठेत जेमतेम चारशे पाचशे पेट्यांची आवक होत असल्याने यंदा आंब्याची उलाढाल दिवसाला पाच लाखाने घटली आहे.
कोल्हापुरात कोकणातील सावंतवाडी, दोडामार्ग, मालवण, देवगड, कुडाळ, वेंगुर्ला येथून अस्सल हापूस आंबा येतो. त्यासोबत रत्नागिरीतून देवरूख, राजापूर, चिपळूण येथील रत्नागिरी हापूस आंबा येतो. एप्रिलमध्ये दरवर्षी दिवसाकाठी एक हजार ते पाच हजार आंबा पेट्यांची वा बॉक्सची आवक होते. यंदा मुंबई बाजारपेठेतून भाव चांगला मिळाला. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात बहुतांशी कोकणी आंबा माल मुंबईत व तेथून परप्रांतात किंवा परदेशात पाठवला गेला.
पंधरा दिवसात कोकणात ढगाळ वातावरण अनेकदा झाले. याच वेळी बागायदारांनी तातडीने आंबा उतरण्यावर भर दिला. त्यानंतर जास्त झालेला माल कोल्हापूर ही जवळची बाजारपेठ म्हणून कोल्हापुरात पाठवला गेला. तोही येथील मागणीनुसार कमीच पडाला. सध्या आठ दिवसात ५०० ते १००० पेट्याची आवक होते. त्यामुळे देवगड हापूस, रत्नागिरी हापूसचे भाव दुप्पट वाढले आहेत. कोकणी हापूस बॉक्सबाबत असेच घडत आहे. ५ हजार बॉक्स सरासरी आवक होत आहे. एक डझन आंबा बॉक्ससाठी सरासरी भाव पाचशे रुपये आहे.
इतका महाग आंबा हौशीकडून जरूर खरेदी होतो. मात्र, सर्वसामान्यांना भाव परवडत नाही म्हणून येथे दक्षिणेकडील लालबाग आंबा, मद्रास आंब्याची यंदा दुप्पटीने आवक होत आहे. हा आंबा दिसण्यास कोकणी हापूस सारखाच आहे. तो पूर्ण पिवळ्या रंगाचा आहे तर लालबाग हापूसला देठाजवळ लालरंग आहे. या दोन्ही आंबाची गोडीही चांगली आहे. त्यामुळे अनेकजण कोकणी हापूस एवजी दक्षिणेकडील हापूस खरेदीवर भर देत आहेत.

ठळक चौकट
बाजार पेठेतील स्थिती
आंबा प्रकार ----------- आवक ----- भाव
देवगड हापूस पेटी --------३९३ ------- २५०० ते ३००० रुपये
रत्नगिरी हापूस पेटी --------२०० ------ १८०० ते २००० रुपये
कोकणी हापूस बॉक्स -----५००० ------ २०० ते ८०० रुपये
लालबाग हापूस बॉक्स ----२००० ------ १०० ते २०० रुपये
मद्रास हापूस बॉक्स ------ ४५०० ------- २०० ते ५०० रुपये

चौकट
आवक उलाढाल घसरली
गतवर्षी एप्रील महिन्यातील देवगड हापूसची बॉक्स आवक दिवसकाठी १० ते १२ हजार होती तेव्हा एका बॉक्सचा भाव २५० ते ३०० रुपये होता. यंदाही आवक पाच हजार बॉक्स आवक होताना भाव ५०० ते ६०० रूपये आहे. गतवर्षी दिवसाकाठीची उलाढाल ३५ लाख रूपये सरासरी होती. यंदा ही उलाढाल २५ लाख आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com