
शाहू छत्रपती गोल्ड कप स्पर्धेला सुरुवात
00313 व 00315
कोल्हापूर : शाहू छत्रपती गोल्ड चषक फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी संभाजीराजे, मालोजीराजे, डॉ. संजय डी. पाटील, संजय कुलकर्णी, नंदू बामणे, विश्वास कांबळे, मनोज जाधव, अमर सासणे, माणिक मंडलिक आदी.
दुसऱ्या छायाचित्रात फुलेवाडी विरुद्ध पाटाकडील (ब) यांच्यात झालेल्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
लोगो - शाहू छत्रपती गोल्ड कप
फुलेवाडी, शिवाजी मंडळची विजयी सलामी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : येथे आजपासून सुरू झालेल्या शाहू छत्रपती गोल्ड कप अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत फुलेवाडी, शिवाजी मंडळाने विजयी सलामी दिली.
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी याज्ञसेनीराजे छत्रपती, डी. वाय. पाटील समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, सागर कुलकर्णी, संभाजीराजे, मालोजीराजे, मधुरिमाराजे, यशस्वीनीराजे, यशराजराजे यांची उपस्थिती होती.
पहिल्या सामन्यात श्री शिवाजी तरुण मंडळ संघाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ संघावर ४ विरुद्ध ० गोल फरकाने विजय मिळवला. आक्रमक मंडळाने उत्तरेश्वर संघावर सातत्याने दबाव बनवून ठेवला. संदेश कासार याने सहाव्या मिनिटाला गोल नोंदविला. या नंतर ३२ व्या मिनिटाला संदेशने दुसऱ्या गोलची नोंद केली. उत्तरार्धात करण चव्हाण - बंद्रे याने ५१ व्या मिनिटाला गोल केला. संकेत साळोखे याने ६८ व्या मिनिटाला गोल करीत सामना ४ - ० असा जिंकला.
फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ संघाने पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ संघावर २ -० अशी मात केली. पीटीएम ब संघाने आक्रमक सुरुवात करत फुलेवाडी संघावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सामन्याच्या १३ व्या मिनिटाला फुलेवाडी संघाच्या रोहित मंडलिक याने फ्री कीकवर गोल नोंदवत संघाला १ - ० अशी आघाडी मिळवून दिली. या नंतर दोन्ही संघांकडून झालेल्या चढाया फोल ठरल्या. उत्तरार्धात फुलेवाडी संघाची आक्रमणे पीटीएम ‘ब’ संघाच्या बचाव फळीने थोपवली. सामान्यांच्या ७८ व्या मिनिटाला पीटीएम ‘ब’ संघाच्या साईराज पाटील याने गोलजाळीजवळ चेंडू हाताळल्याने फुलेवाडी संघाला पेनल्टी बहाल करण्यात आली. रोहित मंडलिक ही संधी साधत आघाडी मजबूत केली व सामना २ - ० असा जिंकला.
आजचे सामने
सकाळी ८ - बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध कोल्हापूर पोलिस
संध्याकाळी ४ - प्रॅक्टिस क्लब विरुद्ध झुंजार क्लब
चौकट
१८ वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन दिमाखात झाले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्याविष्कार यातून शाहूंच्या जीवनकार्याची झलक यावेळी दाखवली. पोलिस बँडने बहारदार सादरीकरण केले.
चौकट
फुटबॉल गोल्ड कपचे अनावरण मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. हा चषक सोन्याचा असून स्पर्धेच्या सुरुवातीपासून हाच चषक विजेत्या संघाला देण्यात येतो. फिरता चषक असून विजेत्याला चांदीचा कायमस्वरूपी चषक दिला जाणार आहे.