
टीपी कार्यभार
टीपीतील अधिकारी
ठरतात औटघटकेचे
कोल्हापूर ः महापालिकेच्या नगररचना विभागात (टीपी) अधिकाऱ्यांची नेमणूक औटघटकेची ठरत आहे. आता अतिरिक्त कार्यभार सातारा येथील उपशहर रचनाकार या कनिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवला आहे. त्यांच्याकडे सातारा, कोल्हापूर, सोलापूरचीही जबाबदारी आहे. सोमवारपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता आहे.
येथील सहायक संचालकांची बदली झाल्यानंतर अजूनही पूर्णवेळ अधिकारी मिळालेला नाही. बदलीनंतर अतिरिक्त कार्यभार दिलेले सहायक संचालक निवृत्त झाले. त्यानंतर सांगली महापालिकेतील सहायक संचालकांकडे तो कार्यभार दिला. ते दोन दिवस येथील कार्यालयात येत होते. त्यांना पंधरा दिवसांच्या कार्यशाळेला पाठवले. त्यामुळे रिक्त पदासाठी सातारा येथील उपशहर रचनाकार असलेल्या कनिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवला आहे. सांगलीतील सहायक संचालक येऊपर्यंत ही स्थिती राहणार आहे. त्यामुळे कामांवर परिणाम होत आहे.