संत रोहीदास महामंडळ वर्धापनदीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत रोहीदास महामंडळ वर्धापनदीन
संत रोहीदास महामंडळ वर्धापनदीन

संत रोहीदास महामंडळ वर्धापनदीन

sakal_logo
By

संत रोहिदास महामंडळाचा वर्धापन दिन
कोल्हापूर ः संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचा वर्धापन दिन कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी अखिल महाराष्ट्र चर्मकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ मोरे व जिल्हाध्यक्ष विठ्ठल नांगरे यांच्या हस्ते संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संतोष बिसुरे, भगवान रोटे यांनी मनोगत व्यक्त केले. दामाजी रोटे, रमेश टोणपे, अजित हंकारे, दिपक खांडेकर, वसंत पोवार, रामचंद्र गडकर, लक्ष्मण चौधरी, संत रोहिदास विकास फाउंडेशनचे युवराज मोरे तसेच विविध महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा व्यवस्थापक एन. एम. पवार यांनी महामंडळाकडील योजनांची माहिती दिली व या योजना तळागाळात पोहचवण्याचे आवाहन केले.