सर्वसामान्यांना योजनांचा लाभ द्या

सर्वसामान्यांना योजनांचा लाभ द्या

ich39.jpg
00391
इचलकरंजी ः महापालिकेत झालेल्या शासकीय योजनांचा जत्रा उपक्रमांवेळी खासदार धैर्यशील माने यांसह आयुक्त सुधाकर देशमुख, प्रांताधिकारी मौसमी बर्डे - चौगुले आदी उपस्थीत होते.

सर्वसामान्यांना योजनांचा लाभ द्या
खासदार धैर्यशील माने; महापालिकेत शासकीय योजनांची जत्रा
इचलकरंजी, ता. ४ ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय योजनांची जत्रा हा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकत्र येवून या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना शासकीय योजनांचे लाभ मिळवून द्यावेत, असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले.
इचलकरंजी महापालिकेच्या सभागृहात शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमात ते बोलत होते. आयुक्त सुधाकर देशमुख, प्रांताधिकारी मौसमी बर्डे - चौगुले, अपर तहसिलदार शरद पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने, भाजपचे शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांची प्रमुख उपस्थिती होती.
हातकणंगलेचे कृषी अधिकारी अभिजीत गडदे यांनी कृषी विभागाच्या केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांची माहिती दिली. पशुसंवर्धन विभागाचे रविंद्र जंगम यांनी चार योजनांची माहिती देवून या योजना दोन जिल्हास्तरीय व दोन राज्यस्तरीय असल्याचे नमूद केले. गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांनी जन-मृत्यू, विवाह नोंदणी, घरकुल योजना, शौचालय प्रस्ताव, महिला बचत गटांन अल्प दरात कर्ज देणे आदींबाबतची माहिती दिली.
महापालिकेचे उपायुक्त केतन गुजर यांनी वैयक्तिक लाभाच्या योजना, घरकुल योजना यांची माहिती देत ९ ते ११ मेदरम्यान आठ योजनांसाठी राजीव गांधी भवन येथे तीन दिवसांचा कँप घेणार असल्याचे सांगितले. अप्पर तहसिलदार पाटील यांनी शासनाच्यावतीने राबवल्या जाणाऱ्‍या योजनांची माहिती दिली.
महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनी महावितरणच्या योजनांची माहिती दिली. सहायक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी असंघटीत कामगारांच्या योजनांबाबत माहिती दिली. शिवसेना शहरप्रमुख भाऊसो आवळे, माजी नगरसेवक मनोज हिंगमिरे, शहाजी भोसले, उदयसिंग पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com