
विद्यार्थी बनले विज्ञान मित्र
gad42.jpg
00400
गडहिंग्लज : मराठी विज्ञान परिषद व रावसाहेब कित्तूरकर विश्वस्त संस्थेतर्फे झालेल्या विज्ञान मित्र कार्यशाळेत सलीम नदाफ यांनी विज्ञानातील सोपे प्रयोग करून दाखवले.
----------------------------
विद्यार्थी बनले विज्ञान मित्र
''मविप''तर्फे कार्यशाळा; कचऱ्यापासून खत, आकाश दर्शनासह सुक्ष्मजीवांची सैर
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ : मराठी विज्ञान परिषदेची येथील शाखा व रावसाहेब कित्तूरकर विश्वस्त संस्थेतर्फे कार्यशाळा झाली. शहरासह विविध गावातील शाळांचे ८० विद्यार्थी सहभागी झाले होते.
कचऱ्यापासून खत बनवणे, वैज्ञानिक प्रयोग, हॅम रेडिओचे प्रात्यक्षिक दाखवले. आकाशदर्शनासह सुक्ष्मजीवांची सैर केली. येथील गडहिंग्लज सायन्स सेंटरमध्ये पाच दिवस चाललेल्या या कार्यशाळेतून विद्यार्थी विज्ञान मित्र बनले. मविपचे उपाध्यक्ष बी. जी. काटे यांच्याहस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. बसाप्पा आरबोळे यांनी हॅम रेडिओ कसा वापरावा याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. संभाजी पाटील (कोल्हापूर) यांनी विज्ञान कथा, विज्ञान संशोधनातील गमती-जमती सांगितल्या. दुसऱ्या दिवशी अभिलाषा चव्हाण व सोनाली पाटोळे यांनी वैज्ञानिक तत्वाबाबत मार्गदर्शन केले. मंजिरी देशपांडे यांनी गणितातील गमती-जमती सांगितल्या. डॉ. नेर्ले यांनी घरगुती ओल्या कचऱ्यापासून खत कसे बनवावे यांचे प्रात्यक्षिक दाखवले. बाबासाहेब मगदूम (निपाणी) व किरण गवळी (राधानगरी) यांनी दुर्बिणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आकाश दर्शन घडवले.
तिसऱ्या दिवशी भाग्यश्री शिंत्रे व सौ. परिट यांनी कागदापासून विविध वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे करुण हंबीर यांनी टाकाऊ घरगुती वस्तूंचे प्रयोग करुन दाखवले. चौथ्या दिवशी डॉ. वरुण धूप, डॉ. सीमा साखरे, नारायण सावंत यांनी चित्रफितीच्या माध्यमातून सूक्ष्मजीवांची सफर घडवून आणली. सलीम नदाफ यांनी प्रयोगांच्या निरिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. पाचव्या दिवशी पहाटे पक्षी निरीक्षण व निसर्ग भ्रमंतीचा कार्यक्रम झाला. फिरोज चाऊस (निपाणी) यांनी सोलर सिस्टिमची माहिती दिली. डॉ. एस. के. नेर्ले यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेमागील भूमिका स्पष्ट केली.