बेळगुंदीत मंगळवारपासून महालक्ष्मी देवीची यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगुंदीत मंगळवारपासून महालक्ष्मी देवीची यात्रा
बेळगुंदीत मंगळवारपासून महालक्ष्मी देवीची यात्रा

बेळगुंदीत मंगळवारपासून महालक्ष्मी देवीची यात्रा

sakal_logo
By

बेळगुंदीत मंगळवारपासून
महालक्ष्मी देवीची यात्रा
गडहिंग्लज : बेळगुंदी (ता. गडहिंग्लज) येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा होणार आहे. नऊ वर्षांनंतर यात्रा होत आहे. यानिमित्त मंगळवारपासून (ता.९) तीन दिवस धार्मिक, विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यकम होणार आहेत.
मंगळवारी रात्री दहाला महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची विधीवत पुजा होईल. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ होईल. बुधवारी (ता. १०) पहाटे महालक्ष्मी स्थानापन्न होईल. त्यांनतर पुजा होणार आहे. बुधवार हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. गुरुवारी (ता. ११) सकाळी दंडवत व त्यांनतर देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. सायंकाळी लक्ष्मीदेवी पावन देण्याचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी दुपारी तीनला हातात कासरा धरुन बैल पळवणे, बसून घोडा पळवण्याची शर्यत होईल. दुपारी जनरल घोडागाडी शर्यत होणार आहे. सायंकाळी चारला जनरल बैलगाडी शर्यत होणार आहे. विजेत्यांना विजेत्यांना बक्षीस आहेत. इच्छूकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यात्रा समितीचे अध्यक्ष मिलिंद मगदूम यांनी केले आहे.