जलद बुद्धीबळ स्पर्धा आज, उद्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलद बुद्धीबळ स्पर्धा आज, उद्या
जलद बुद्धीबळ स्पर्धा आज, उद्या

जलद बुद्धीबळ स्पर्धा आज, उद्या

sakal_logo
By

जलद बुद्धीबळ स्पर्धा आज, उद्या
इचलकरंजी, ता. ५ ः देशभक्त बाबासाहेब खंजीरे यांच्या जन्म शताब्दीनिमित्त कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व केन चेस अकॅडमीतर्फे कोल्हापूर जिल्हा मर्यादीत व खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा ६ व ७ मे रोजी होणार आहे. युनिक हायस्कूल (फुलचंद गार्डन समोर) येथे स्विस लीग पद्धतीने आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळाच्या नियमानुसार होणार आहे. स्पर्धा जिल्ह्यातील सर्वात मोठी बुद्धिबळ स्पर्धा असून एकूण ९२ बक्षीसे असणार आहेत. याबाबतची माहिती कार्याध्यक्ष राहूल खंजीरे यांनी दिली.
शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता स्पर्धेचे उद्‍घाटन मान्यवरांच्या हस्ते होईल. स्पर्धा दोन प्रकारात होणार असून कोल्हापूर जिल्हा मर्यादित बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन खेळाडूंना रोख रक्कम व ट्रॉफी देण्यात येणार आहे. तसेच ४ ते २२ क्रमांकापर्यंत रोख रक्कमेची बक्षीसे आहेत. उत्तेजनार्थ बक्षीस, उत्कृष्ट महिला, उत्कृष्ट इचलकरंजी, उत्कृष्ट वयस्कर, उत्कृष्ट बिगरमानांकित खेळाडू व ७, ९, ११, १३, १५ वर्षाखालील गटात रोख रक्कम, ट्रॉफी व मेडल्स अशी ३८ बक्षीस आहेत. इचलकरंजी गटासाठी उत्कृष्ट महिला व ७, ९, ११,१३ व १५ वर्षाखालील गटासाठी आकर्षक ट्रॉफी व मेडल्स अशी ३० बक्षिसे दिली जाणार आहेत.
रविवारी होणाऱ्या खुली बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन खेळाडूंना रोख रक्कम व ट्रॉफी तसेच क्रमांक ४ ते २० पर्यंत रोख रक्कमेचे बक्षीस दिले जाणार आहे. उत्तेजनार्थ बक्षीस, उत्कृष्ट महिला, उत्कृष्ट इचलकरंजी, उत्कृष्ट वयस्कर, उत्कृष्ट बिगर मानांकित खेळाडू व ७, ९, ११, १३, १५ वर्षाखालील गटात रोख रक्कम, ट्रॉफी व मेडल्स या व्यतिरिक्त इचलकरंजी उत्कृष्ट महिलासाठी ट्रॉफी व मेडल्स, उत्कृष्ट दीव्यांग विशेष बक्षीस अशी एकूण ९२ बक्षीसे दिली जाणार आहेत. प्रथम येणाऱ्या खेळाडूंना प्रवेश दिला जाणार आहे.