गोकुळ बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळ बातमी
गोकुळ बातमी

गोकुळ बातमी

sakal_logo
By

‘गोकुळ’चे चाचणी लेखापरीक्षण सुरूच ठेवा

उच्च न्यायालयाचे आदेश; याचिका फेटाळली, सत्ताधाऱ्यांना धक्का

कोल्हापूर, ता. ४ ः कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) शासनाच्या आदेशाने सुरू असलेले चाचणी लेखापरीक्षण थांबवावे, यासाठी संघाच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्यात आली. येत्या एक महिन्यात लेखा परीक्षण पूर्ण करून ८ जूनपर्यंत त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या निर्णयाने सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी संघाच्या कारभाराविरोधात तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन दुग्धविकास मंत्र्यांनी १० जानेवारी २०२३ रोजी संघाच्या चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश दिले होते. शासनाच्या या कारवाईविरोधात सत्तारूढ गटाच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून चाचणी लेखा परीक्षणाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. या याचिकेवरील सुनावणी गुरुवारी (ता. ४) झाली. त्यात उच्च न्यायालयाने ‘गोकुळ’ची याचिका फेटाळून लावताना येत्या महिन्याभरात ही चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल ८ जूनपर्यंत न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले. हा अहवाल येईपर्यंत संघावर कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.