
धर्मांतर बंदी कायदा रद्द करा
ajr42.jpg
00565
आजरा ः येथील संविधानिक धार्मिक हक्क परिषदेत प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.
-----------------------
धर्मांतर बंदी कायदा रद्द करा
प्रा. गौतमीपुत्र कांबळे; आजऱ्यात संविधानिक धार्मिक हक्क परिषद
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ४ ः धर्मांतर रोखण्यासाठी देशातील आठ राज्यांत गोहत्या व धर्मांतर बंदी कायदा लागू केला आहे. लव्ह जिहादचे भ्रामक चित्र उभे करून त्या अनुषंगाने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी महाराष्ट्रातही धर्मांतर बंदी कायदा करण्याची शासन प्रयोजित मागणी होत आहे. अनुचित मार्गाने होणाऱ्या धर्मांतर बंदी कायद्यालाही आमचा विरोध असून भारतीयांचे संविधानिक धार्मिक स्वातंत्र्य व मूलभूत हक्क हिरावून घेतले जातात. त्यामुळे हा कायदा रद्द करावा, अशी मागणी सेक्युलर मूव्हमेंट महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी केली.
येथील गंगामाई वाचन मंदिरात संविधानिक धार्मिक हक्क परिषद झाली. प्रा. जी. व्ही. सरतापे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रा. कांबळे अध्यक्षस्थानी होते. यावेळी निवृत्त सहायक पोलिस आयुक्त भरत शेळके, प्रा. डॉ. भरत नाईक, प्रा. कैलास काळे, जिल्हाध्यक्ष अजयकुमार देशमुख, दिलीप सासणे, सुरेश भंडारे, विकास भंडारे उपस्थित होते. प्रा. कांबळे म्हणाले, ‘सध्या देशात धार्मिक वातावरण नसल्याने कोणी उघड बोलायला तयार नाही. अनुचित मार्गाने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी देशातील आठ राज्यांत गोहत्या व धर्मांतर बंदी कायदा लागू केला आहे. त्यामुळे भारतीयांना दिलेल्या संविधानिक धार्मिक स्वातंत्र्याला डावलले जात आहे. संविधानानुसार मूलभूत हक्क हिरावून घेता येणार नाहीत किंवा त्यांचा संकोच करणारा कोणताही कायदा करता येणार नाही. त्यामुळे हे कायदे तत्काळ रद्द करावेत. गोहत्या, धर्मांतर बंदी व लव्ह जिहाद कायद्याविरोधात सेक्युलर मूव्हमेंट राज्यभर मोहीम राबवणार आहे.’ रवि भोसले, सर्जेराव कांबळे, प्रवीण कश्यप, गौतम कांबळे, अंकुश कांबळे, शिवाजी सम्राट, संदीप सरोळीकर, संभाजी कांबळे, संदीप कांबळे, संतोष मासोळे, मिलिंद कांबळे, आशिष भोसले, भरत कांबळे, प्रताप कांबळे, विनीत भोसले, आकाश भोसले, नेताजी कांबळे, सुदेश कांबळे, विलास कांबळे, एकनाथ कांबळे, मंगेश कांबळे आदी उपस्थित होते. गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड व करवीर या तालुक्यांतून कार्यकर्ते उपस्थित होते. सागर कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. भिकाजी कांबळे यांनी आभार मानले.