प्रधानमंत्री आवास योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रधानमंत्री आवास योजना
प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजना

sakal_logo
By

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विशेष कॅम्प
कोल्हापूर, ता. ४ : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजुर प्रकल्पांमधील ज्या लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी घेतलेली नाही. त्यांच्या बांधकाम परवानगीसाठी विशेष कॅम्पचे आयोजन केले आहे. ८ व ९ मे रोजी राजारामपुरी, बागल मार्केटमधील नगररचना कार्यालयात कार्यालयीन वेळेत तो घेण्यात येणार आहे.
बांधकाम वेळेत सुरू व्हावे, ज्या लाभार्थ्यांनी बांधकामे पूर्ण झाली आहेत अशा बांधकामांना पुर्णत्वाचा दाखला मिळावा हा उद्देश आहे. कॅम्पमध्ये मालकी हक्काचा सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्ड मोजणी नकाशा, ले आऊटमधील बांधकाम असेल तर मंजुरीची प्रत, गुंठेवारी नियमित असेल, तर बिगरशेती आदेश, मोजणी नकाशा, बांधकामाचा नकाशा या कागदपत्रांसह संबंधित नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.