रेल्वे प्रशासन

रेल्वे प्रशासन

रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांची दखल घ्याच
महाव्यवस्थापक नरेश लालवाणी आज कोल्हापूरात; उत्तरांची प्रवाशांकडून अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. ४ ः प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाकडून ढीगभर अश्वासन दिली. मात्र अपवाद वगळता फारसे काही घडलेले नाही. त्यामुळे प्रवासी आहेत. पण, रेल्वे संख्या कमी इथपासून ते रेल्वे उड्डाणपूल बांधणी नेमकी कधी होणार अशा अनेक प्रश्नांची ठोस माहिती येथे मिळत नाही. रेल्वे स्थानकावर पायाभूत सुविधा होत असूनही प्रवास मात्र घडत नाही. अशा स्थितीत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी उद्या (गुरूवारी) कोल्हापूरात येत आहेत. त्यांनीच ठोस उत्तर द्यावीत अशी अपेक्षा रेल्वे प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

कोल्हापूर शहरात रोज जवळपास सरासरी एक ते दीड लाख प्रवासी वर्ग येतो. त्यातील अवघा दहा टक्के प्रवासी वर्ग रेल्वेचा आहे. दक्षिण तसेच उत्तर भारतात, गोव्यात व पूर्वांचल अशा चारही दिशांना जाणारा-येणारा मोठा प्रवासी वर्ग कोल्हापूरात आहे. असे असूनही रेल्वे गाडी व डब्यांची अपुरी संख्या, गैरसोयीचे वेळापत्रक, आरक्षणातील काळाबाजार आदी कारणांमुळे रेल्वेने जाण्यास इच्छुक प्रवासी वर्ग अन्य खासगी वाहनांचा वापर करत आहेत. यात रेल्वेचा महसूल बुडतो. प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागते. शहरातील वाहतूक कोंडी वाढते.
कोल्हापूर रेल्वे स्थानकावर पूर्वी दोनच प्लॅट फार्म होते. सध्या चार प्लॅटफॉर्म झाले आहेत. रेल्वेच्या पायभूत सुविधा झाल्या आहेत. मात्र, कोल्हापूर ते अमृतसर व गुहावटी या मार्गावर उत्तरभारत, पूर्वांचलचा प्रवास घडविणाऱ्या नव्या गाड्या सुरू झालेल्या नाहीत. मुंबईला जाणारा सर्वाधिक प्रवासी येथे असून, बंद झालेली सह्याद्री रेल्वे पुन्हा सुरू करण्याचे अश्वासन पाच अधिकाऱ्यांनी दिले. मात्र, सह्याद्री एक्सप्रेस अद्याप सुरू झालेली नाही. ज्या गाड्या सध्या धावतात तेथे तत्काळचे आरक्षण अवघ्या काही मिनिटात संपून जाते. त्यामुळे अनेकांची निराशा होते.
परप्रांतीय कामगार वर्ग, औद्योगिक, व्यापारी क्षेत्रातील अनेक लोक परप्रांतातून येथे येतात-जातात. त्यांना पंजाब, काश्मीर किंवा केरळकडे जायचे झाल्यास दिर्घपल्ल्याच्या नव्या गाड्याच सुरू नसल्याने तिन टप्प्यात प्रवास करण्याची वेळ येते.

चौकट
डझनभर अधिकाऱ्यांचे
अंमलबजावणीचे अश्वासन
कोल्हापूरातील परिख पूलाला पर्यायी उड्डाणपूल बांधण्याबाबत महापालिका व रेल्वे प्रशासन यांच्यात एकवाक्यता नाही. परिणामी प्रवाशांना धोकादायक स्थितीत पूलाखालून चालत जावे लागते. कोल्हापूर रेल्वेमार्ग कोकण रेल्वेला जोडण्याचे प्रश्न ‘जैसे थे’ आहे. असे वरील सर्व प्रश्न वर्षावनुर्षे कायम आहेत. डझनभर अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी करण्याचे अश्वासन दिले. आता नवे महाव्यवस्थापक या विषयी काय भाष्य करतात याकडे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com