गोकुळचा खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळचा खुलासा
गोकुळचा खुलासा

गोकुळचा खुलासा

sakal_logo
By

प्रशासक नियुक्तीचा डाव फसला

संघाचा खुलासा; कारवाई न करण्याचे न्यायालयाचे आदेश

कोल्हापूर ः ‘गोकुळ’च्या चाचणी लेखा परीक्षणाबाबत शासनाने ८ जूनपर्यंत संघावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असून, या माध्यमातून ‘गोकुळ’वर सत्तेचा गैरवापर करून प्रशासक नियुक्त करण्याचा संचालिका शौमिका महाडिक यांचा डाव फसल्याचा खुलासा संघामार्फत करण्यात आला आहे.
संचालिका सौ. महाडिक यांच्या तक्रारीवरून दुग्ध विकास मंत्र्यांनी ‘गोकुळ’चे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध गोकुळ दूध संघाने उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करून हे आदेश रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर आज न्यायमूर्ती श्रीराम व न्यायमूर्ती पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी पुढील सुनावणी ८ जूनला होत आहे, तोपर्यंत पुढील कोणतीही कारवाई करू नये, असे आदेशही दिल्याची माहिती ‘गोकुळ’कडून दिली. या निर्णयाने सत्तेचा वापर करून राजकीय द्वेषापोटी ‘गोकुळ’वर प्रशासक नियुक्तीचा विरोधकांचा प्रयत्न असफल झाल्याचे खुलाशात म्हटले आहे.