
‘मे’ अखेरच्या आठवड्यात पदवी परीक्षांचा प्रारंभ
‘मे’ अखेरच्या आठवड्यात
विद्यापीठ पदवी परीक्षांचा प्रारंभ
कोल्हापूर, ता. ४ ः शिवाजी विद्यापीठाच्या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांचा प्रारंभ मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात होणार आहे. विद्यार्थी, पालक, प्राचार्य आणि शिक्षकांनी केलेल्या विनंतीनुसार विद्यापीठाने या परीक्षांपूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकांच्या १५ दिवस अगोदर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाकडून दोन दिवसांत जाहीर केले जाणार आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने उन्हाळी सत्रातील पदवी, पदव्युत्तर परीक्षा १२ जूनपासून घेण्याचे नियोजन करून त्याबाबतचे वेळापत्रक एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर केले होते. त्यावर प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधून या परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करण्याबाबत विनंती केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. पुढील शिक्षणासाठीचा प्रवेश आणि नोकरीच्या संधीपासून विद्यार्थी वंचित राहू नयेत म्हणून विद्यापीठ प्रशासनाने या परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षांच्या नव्या तारखा दोन दिवसांमध्ये जाहीर केल्या जातील. परीक्षा लवकर होणार असल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी करावी, असे आवाहन परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी केले.