
पोलिस वृत्त एकत्रित
पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण; तिघांवर गुन्हा
कोल्हापूर ः - आर. के. नगरात पूर्ववैमनस्यातून एका तरुणास मारहाण झाल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला. आदिनाथ काईगडे, अभय मोरे आणि रोहित मोरे (सर्व रा. मोरेवाडी, ता. करवीर) अशी त्यांची नावे असल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली. पोलिसांकडील माहिती अशी, आर. के. नगर येथील खडीच्या गणपती मंदिराजवळ रोहित रमेश परगेकर (वय २४, रा. मगदूम कॉलनी, आर. के. नगर) याला पूर्ववैमनस्यातून तिघांनी बोलवून घेऊन दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. जखमी परगेकर याने दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.
-
दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने आईला मारहाण
कोल्हापूर ः दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून मुलाने आईला चाबकाने मारहाण केली. हा प्रकार कोगे (ता. करवीर) येथे दोन मेस सकाळी अकराच्या सुमारास घडला. याची फिर्याद गीता चंद्रकांत पाटील (वय ६२) यांनी काल करवीर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी महादेव चंद्रकांत पाटील (वय २५, दोघे रा. कोगे) याच्यावर गुन्हा दाखल केला.