तरुणांनी अन्यायाविरुद्ध लढावे; डॉ. राजन गवस

तरुणांनी अन्यायाविरुद्ध लढावे; डॉ. राजन गवस

00627
भडगाव : राष्ट्र सेवा दलातर्फे आयोजित शिबिराच्या समारोप कार्यक्रमात डॉ. राजन गवस यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर सिद्धार्थ बन्ने, प्रा. सुनील शिंत्रे, अॅड. श्रीपतराव शिंदे, डॉ. नागेश पट्टणशेट्टी, सुरेश शिप्पूरकर उपस्थित होते.

तरुणांनी अन्यायाविरुद्ध लढावे
डॉ. राजन गवस; राष्ट्र सेवा दलाच्या शिबिराचा समारोप
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ७ : जातिव्यवस्थेविरुद्ध लढत असताना संविधानाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणे काळाची गरज आहे. आजच्या तरुणांनी अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी केले. समताधिष्टीत समाज निर्मितीसाठी राष्ट्र सेवा दल ही संघटना एकमेव पर्याय असू शकते असेही मत त्यांनी व्यक्त केले.
भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. ए. डी. शिंदे इंजिनिअरिंग कॉलेजवर राष्ट्र सेवा दलाचे शिबीर झाले. त्याच्या समारोपप्रसंगी डॉ. गवस बोलत होते. राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे अध्यक्षस्थानी होते.
अॅड. शिंदे म्हणाले, ‘‘भारतीय राज्यघटना ही आपल्या सर्वांचा कणा आहे. ती अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.’’ वैद्य यांनी आजच्या पिढीला संस्काराची गरज असल्याचे सांगितले. सुरेश शिप्पूरकर, डॉ. नागेश पट्टणशेट्टी, प्रा. सुनील शिंत्रे, बाळासाहेब गुरव, सिद्धार्थ बन्ने आदी उपस्थित होते. अरविंद बारदेस्कर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बाळासाहेब मुल्ला यांनी शिबिराच्या अहवालाचे वाचन केले. गणपतराव पाटोळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. स्वाती कोरी यांनी आभार मानले.
दरम्यान, शिबिरात झांज, लेझिम, बर्ची, लाठीकाठी, नृत्य या खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. १४ शाळातून १४४ विद्यार्थी सहभागी झाले होते. बाबासाहेब नदाफ, साताप्पा कांबळे, रावसाहेब शिंदे, प्रा. पी. डी. पाटील, प्रा. शिवाजी होडगे, प्रा. आप्पासाहेब कमलाकर यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com