मलिग्रे पुरवणी लेख-1

मलिग्रे पुरवणी लेख-1

पट्टी ः श्री महालक्ष्मी -चाळोबा यात्रा विशेष, (मलिग्रे, कागिनवाडी)

फोटो क्रमांक : gad५३.jpg :
00699
श्री महालक्ष्मीची उत्सव मूर्ती
-----------------------------------------------

लीड :
मलिग्रे (ता. आजरा) येथील श्री महालक्ष्मी व श्री चाळोबा देवाची यात्रा तब्बल १४ वर्षांनंतर होत आहे. ५ ते ७ मे अखेर होणाऱ्या यात्रेसाठी ग्रामपंचायत, यात्रा कमिटी, देवस्थान कमिटी व मंबईकर ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. यात्रेनिमित्त धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजन कार्यक्रमासह विविध स्पर्धांचे नियोजन केले आहे. मलिग्रे व कागिनवाडीचे श्रध्दास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी व श्री चाळोबा देवाच्या यात्रेविषयी...
- गणेश बुरुड, महागाव
------------------------------------------------------------

मलिग्रे-कागिनवाडीचे श्रद्धास्थान

आजरा तालुक्याच्या पूर्व भागात डोंगराळ पट्ट्यात मलिग्रे व कागिनवाडी गावे वसली आहेत. विकासकामांच्या माध्यमातून गावाला विकासाचा चेहरा दिला आहे. या गावच्या यात्रेला मंगळवार (ता. २) पासून सुरुवात झाली आहे. मंगळवारी ईरडे पडून सीमा बांधण्यासाठी देवस्की करण्यात आली. श्री महालक्ष्मी देवीच्या मुख्य यात्रेबरोबर स्थानिक ग्रामदैवत चाळोबा, मल्लिकार्जुन, रवळनाथ व भावेश्वरी देवीचीही यात्रा होत आहे.
यात्रेनिमित्ताने व्यापाऱ्यांनी दुकाने विद्युत रोषणाईद्वारे सजविली आहेत. १४ वर्षांनी यात्रा होत असल्याने यात्रेसाठी सर्व माहेरवाशिणी गावात दाखल झाल्या आहेत. गावचे वैशिष्ट्य म्हणजे मुंबईकरांची संख्या जास्त आहे. यात्रेनिमित्त मंबईकर ग्रामस्थ एक आठवडा आधी गावी आले आहेत. त्यामुळे गाव गर्दीने फूलून दिसत आहे. प्रकाशझोतातील कबड्डी स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. आजरा तालुक्यात पाऊस अधिक असला तरी मलिग्रेचा भाग तसा कमी पावसाचा आहे. बहुतांश शेती कोरडवाहू आहे. त्यामुळे या भागातील लोक कामानिमित्त मुंबईला आहेत. श्री महालक्ष्मी देवीची यात्रा दरवर्षी केली जात होती. काही कालावधीनंतर ती तीन वर्षांनी होऊ लागली. पण दिवसेंदिवस वाढती महागाई पाहता ग्रामस्थांनी पाच वर्षांनी यात्रा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही त्यात बदल करुन सात वर्षांनी यात्रा करण्याचे ठरले. यापूर्वी १९९०, १९९९, २००९ व आता २०२३ मध्ये यात्रा होत आहे.
श्री महालक्ष्मी देवीची प्रतिष्ठापना चंद्रकांत सुतार, भिकाजी सुतार यांच्या घरी केली जाते. यात्रेच्यावेळी शिवाजी गुरव, बाबूराव गुरव हे देवीची पूजा करतात. यानंतर श्री महालक्ष्मी देवी स्थानापन्न होते. हक्कदार व मानकरी धार्मिक विधी व इतर जबाबदारी पार पाडतात. यात्रेदिवशी देवीला रथात स्थानापन्न केल्यानंतर रात्री अकरापासून पहाटे सहापर्यंत लक्ष्मी खेळविण्यात आली. रात्रभर मूर्तीची मिरवणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो. शनिवारी (ता. ६) रात्री बारापासून श्री चाळोबा देवाचा पालखी सोहळा सुरू होतो. पालखीची वाद्य व फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये मिरवणूक सकाळपर्यंत चालते. यात्रेसाठी यात्रा समितीचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुंबई ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, हक्कदार व मानकरी व ग्रामस्थांच्या सहभागाने यात्रेचे नेटके नियोजन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com