आजरा ः खुली गटर अपघाताला निमंत्रण

आजरा ः खुली गटर अपघाताला निमंत्रण

ajr53.txt
ajr54.jpg....

00735
आजरा ः खुली गटारीत अडकलेली चारचाकी गाडी.

चाफे गल्लीतील गटार
देतेय अपघाताला निमंत्रण
वाहनधारकांतून तीव्र संताप; नगरपंचायतीचे दुर्लक्ष

आजरा, ता. ५ ः चाफेगल्ली (ता. आजरा) येथे आजरा-गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गटार अपघाताला निमंत्रण देत आहे. त्यामुळे चारचाकी, दुचाकी वाहनांचे चाक गटारीच्या खड्ड्यात अडकून अपघात होत आहेत. परिसरातील नागरिकांनी याबाबत नगरपंचायतीकडे लेखी निवेदनाद्वारे गटार मुजवण्याची मागणी केली आहे. पण नगरपंचायतीकडून निवेदनाला वाटण्याच्या अक्षता लावल्या जात असून वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चाफे गल्लीत चर्च गल्लीतून पावसाळ्यात येणारे पाणी पलीकडील गटारीमध्ये जाण्यासाठी नगरपंचायतीने रस्त्याचे मध्ये चर घेऊन भुयारी गटार बांधली. ही गटार कचरा साफ करण्यासाठी नगरपंचायतीने दोन ठिकाणी खुली केली आहे. अरुण पोवार यांच्या घरासमोर व मिंगील डिसोझा व रामजी लिचम यांच्या घरासमोर कचरा साफ करण्यासाठी खुले केलेले खड्डे आहेत. गेली तीन वर्षं हेच चित्र आहे. ही गटर्स खुली असल्याने अनेकदा वाहन चालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनाची चाके गटारीत अडकून अपघात घडत आहेत. याकडे नगरपंचायतीचे लेखी व तोंडी निवेदनातून अनेकदा लक्ष वेधले तरी नगरपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. गटर्स दुरुस्तीसाठी नगरपंचायतीने सिमेंटचे पाईप आणून रस्त्याकडेला टाकले आहेत. पण त्याचे काम झालेले नाही. यामुळेही वाहतुकीला अडचण येत आहे. त्यामुळे खुली गटर पूर्वीप्रमाणे दुरुस्त करून बंद करावी, अशी मागणी चाफेगल्ली परिसरातील नागरिक व ग्रामीण भागातील नागरिक करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com