कोरगांवकर बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरगांवकर बातमी
कोरगांवकर बातमी

कोरगांवकर बातमी

sakal_logo
By

M00789

कोरगावकर पेट्रोल पंपास
उच्चांकी विक्रीचा बहुमान

कोल्हापूर, ता. ५ ः सांगली फाटा (पुलाची शिरोली) येथील ए. जी कोरगावकर पेट्रोल पंपास २०२२-२३ सालामध्ये उच्चांकी इंधनाची विक्री केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरवले.
येथील हॉटेल सयाजीमध्ये झालेल्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील हिंदुस्थान पेट्रोलिमच्या डीलर्सच्या बैठकीत हा पुरस्कार दिला.कोरगावकर पेट्रोल पंपास सलग नऊ वर्षे हा पुरस्कार मिळत आहे. यावेळी पेट्रोल पंपाचे मालक आशिष कोरगावकर यांनी चोख व्यवस्थापन, २४ तास ग्राहकांची सेवा, ग्राहक समाधान यांना प्राधान्य दिल्यानेच हा पुरस्कार मिळाल्याचे सांगितले.
पेट्रोल, पॉवर पेट्रोल, डिझेल व ऑइलच्या उच्चांकी विक्रीचे चार पुरस्कार कंपनीचे विभागीय व्यवस्थापक प्रिन्स जिंदाल यांनी कोरगांवकर पेट्रोल पंपास प्रदान करून कोरगावकर कुटुंबीयांचा सन्मान केला. यावेळी कंपनीचे गोवा विभागीय व्यवस्थापक प्रिन्स जिंदाल, कोल्हापूर जिल्हा सेल्स मेनेजर आदित्य अग्रवाल व सांगली जिल्ह्याचे सेल्स मेनेजर श्री कैलास, आशिष कोरगावकर, अनिकेत कोरगावकर, राज कोरगावकर, ओम कोरगावकर आदी उपस्थित होते.