शंकराचार्य पीठातर्फे उत्सवाची सांगता

शंकराचार्य पीठातर्फे उत्सवाची सांगता

00819
...

कोल्हापूर : श्री शंकराचार्य पीठातर्फे पालखीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पीठाचे कार्यकारी मंडळ आणि भक्तगण.
...

शंकराचार्य पीठातर्फे पालखी सोहळा

उत्सवाचा समारोपः पारंपरिक वाद्यांचा गजर अन् आकर्षक रोषणाई

कोल्हापूर, ता. ५ : भक्तांचा अमाप उत्साह आणि महिलांनी धरलेला धार्मिक गाण्यांचा फेर, अशा धार्मिक वातावरणात श्री शंकराचार्य पीठाची पालखी उत्साही वातावरणात निघाली. गेले आठवडाभर सुरु असलेल्या उत्सवाचा आज समारोप झाला.
आद्य शंकराचार्यांच्या २५३१ व्या जयंतीनिमित्त आठवडाभर पीठामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम झाले. शेवटच्या दिवशी पालखी प्रदक्षिणा होऊन उत्सव समाप्त झाला. त्यानुसार सायंकाळी पाच वाजता ‘बीव्हीजी’ ग्रुपचे डॉ. दत्तात्रय गायकवाड यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. सजवलेली पालखी, महिलांनी धरलेला धार्मिक गाण्यांचा फेर, पारंपरिक वाद्ये आणि आकर्षक रोषणाई अशा वातावरणात गंगावेस, रंकाळा बसस्थानक, ताराबाई रोड ते करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरापर्यंत पालखीचे आयोजन केले होते.
मंदिरात स्वामींनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर काही वेळ पालखी विसावली. मंदिरातील मानकऱ्यांचा स्वामींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तेथून पालखी महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेस, शुक्रवार पेठ या मार्गे पुन्हा पीठात आली. यावेळी सुरेश कुलकर्णी, प्रसाद चिकसकर, धनंजय मालू, रामकृष्ण देशपांडे, कार्यवाह शिवस्वरूप भेंडे यांच्यासह मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com