Fri, Sept 22, 2023

मंत्री चंद्रकांत पाटील बार असोसिएशन भेट
मंत्री चंद्रकांत पाटील बार असोसिएशन भेट
Published on : 5 May 2023, 7:16 am
00867
खंडपीठासाठी पाठपुरावा करू
मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन
कोल्हापूर, ता. ५ ः राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जिल्हा बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष ॲड. प्रशांत देसाई यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांना शुभेच्छा देऊन त्यांनी खंडपीठच्या प्रश्नाचा पाठपुरावा करणार. तसेच जिल्हा बार असोसिएशनला निधी आणि सहाय्य देण्याचेही आश्वासन दिले. यावेळी माजी अध्यक्ष ॲड. गिरीश खडके, ॲड. विजय तायशेटे, ॲड. शिवाजी राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी, वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.