
आत्महत्या बातमी
00869
...
केबल व्यावसायिकाची
तणावातून आत्महत्या
कोल्हापूर, ता. ५ ः शिवाजी उद्यम नगर येथील रहिवासी संजय मधुकर गायकवाड (वय ५५) यांनी आज राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी एकावर चाकू हल्ला केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय गायकवाड हे केबल व्यवसायिक होते. आज सकाळी १० वाजता त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. त्यांच्या कुटुंबियांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. मानसिक तणावातून त्यांनी हे कृत्य केले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही दिवसांपूर्वी उद्यमनगर येथे झालेल्या चाकूहल्ल्यात त्यांचा सहभाग होता. त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस दिली होती.