Mon, Sept 25, 2023

पॅथॉलॉजी लॅब मधून मोबाईल चोरी
पॅथॉलॉजी लॅब मधून मोबाईल चोरी
Published on : 5 May 2023, 6:18 am
डायग्नोसिस सेंटरमधून
मोबाईलची चोरी
कोल्हापूर ः शाहुपूरीमधील डायग्नोसिस सेंटरमधून मोबाईल चोरीला गेल्याची घटना शुक्रवारी घडली. याबाबतची फिर्याद विशाल आण्णाप्पा देसाई (वय २८, रा.आणूर, ता.कागल) यांनी शाहुपूरी पोलिस ठाण्यात दिली. स्कॅनिंगसाठी गेल्यावर हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल स्कॅनिंगसाठी गेला होता. यावेळी तेथील चेंजिंग रुममध्ये त्याने बॅग ठेवली होती. परत आल्यावर बॅगेतील मोबाईल आणि रोख पाचशे रुपये नसल्याचे त्याच्या लक्षात आले.