गगनबावडाच्या उपसरपंचपदी वृंदा पाध्ये

गगनबावडाच्या उपसरपंचपदी वृंदा पाध्ये

00161
वृंदा पाध्ये

गगनबावडाच्या उपसरपंचपदी वृंदा पाध्ये
गगनबावडा : गगनबावडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वृंदा श्रीकृष्ण पाध्ये यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मानसी कांबळे होत्या. उपसरपंच मुस्ताक वडगावे यांनी आघाडीत ठरलेप्रमाणे राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. निवडीप्रसंगी आघाडीचे नेते नंदकुमार पोवार, विश्‍वनाथ पोतदार यांच्या हस्ते नूतन उपसरपंच पाध्ये व मावळते उपसरपंच वडगावे यांचा सत्कार करण्यात आला. सदस्य दीपक घाटगे, अरुण चव्हाण, संतोष गावडे, अरुणा पोतदार, सायराबानू म्हालदार, नेहा पाटील, गणपतराव भांबूरे, धनाजी शिंदे, रवींद्र कांबळे, अशोक नागावकर, संतोष पाटील, ईजाज म्हालदार, गुरूनाथ कांबळे, सुनील भांबुरे, सचिन भांबुरे, वैदेही पाध्ये, वैष्णवी पाध्ये, ईशाद रेठरेकर आदी उपस्थित होते. ग्रामसेवक दिलीप डवरी यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com